परीक्षेविरोधात बिहारमध्ये तरुण उतरले रस्त्यांवर, प्रशांत किशोरांचे उपोषण; यादवांचा रेल्वे रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:55 IST2025-01-04T09:54:14+5:302025-01-04T09:55:27+5:30
ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करत जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पाटणातील गांधी मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे.

परीक्षेविरोधात बिहारमध्ये तरुण उतरले रस्त्यांवर, प्रशांत किशोरांचे उपोषण; यादवांचा रेल्वे रोको
विभाष झा/एसपी सिन्हा
पाटणा : बिहार लोकसेवा आयोगाची (बीपीएससी) १३ डिसेंबरला झालेली परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात राजकीय पक्षांनी उडी घेतली. त्यामुळे हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करत आहे.
ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करत जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पाटणातील गांधी मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. पूर्णियाचे अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी आपल्या समर्थकांसह पाटणा सचिवालय हाल्ट येथे रेल्वे रोको आंदोलन केले. दुसरीकडे भापक माले लिबरेशन पक्षाची विद्यार्थी आघाडी ‘अखिल भारतीय विद्यार्थी संघटना’ ऊर्फ आइसा या संघटनेने समविचारी संघटनांसोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी शुक्रवारी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले.