बोगदा येथे गळफ ास घेऊन तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:04+5:302015-07-31T23:03:04+5:30

बोगदा येथे गळफ ास घेऊन तरुणाची आत्महत्या
>वास्को : मुरगाव-बोगदा येथील संजय स्कूल इमारत नव्याने बांधण्याच्या ठिकाणी बिहार येथील उपेंद्र कुमार महातो (वय 30) याने गळफ ास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली़ मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय स्कूलच्या नव्या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पामध्ये उपेंद्र महातो हा गेल्या तीन दिवसांपासून काम करत होता़ त्याच ठिकाणी त्याचा भाऊ (((((प्रेमाद))))))) कुमार महातो हाही काम करीत आह़े आज सकाळी 7़30 वाजण्याच्या सुमारास चहा-फ राळ घेतल्यावर अचानक या इमारतीच्या मागे असलेल्या एका झाडावर गळफ ास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला़ मुरगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सर्वेश गड्डी यांनी घटनेचा पंचनामा केला.(वार्ताहर)