शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

फक्त 10 मिनिटांत घरबसल्या मोफत मिळवा PAN Card, जाणून घ्या नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:16 PM

PAN Card : काही कारणास्तव पॅन कार्ड हरवतं तर काही लोकांना नवीन पॅन कार्ड तयार करायचं असतं. अशा मंडळीना अवघ्या दहा मिनिटांत आता पॅन कार्ड तयार करता येईल. 

नवी दिल्ली - पॅन कार्ड हे व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं असतं. बँकेत अकाऊंट काढण्यासाठी, इनकम टॅक्स भरण्यासाठी, पैशाचे व्यवहार करण्सासाठी, लोन घेण्यासाठी, वाहन अथवा इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचं असतं. मात्र अनेकदा काही कारणास्तव पॅन कार्ड हरवतं तर काही लोकांना नवीन पॅन कार्ड तयार करायचं असतं. अशा मंडळीना अवघ्या दहा मिनिटांत आता पॅन कार्ड तयार करता येईल. 

घरबसल्या काही मिनिटांत सोप्या पद्धतीने पॅन कार्ड काढणं आता शक्य झालं आहे. पॅन कार्डसाठी ऑनलाईन (online pan card) अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज आहे. फक्त 10 मिनिटांत ई-पॅन कार्ड (e-pan card) मिळवता येतं. अर्ज केल्यानंतर काही वेळात ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येतं. मात्र ई-पॅन कार्डसाठी आधार क्रमांक देणं गरजेचं आहे. ऑनलाईन ई-पॅन कार्ड कसं तयार करायचं जाणून घेऊया. 

10 मिनिटांत असं काढा ई-पॅन कार्ड 

- सर्वप्रथम आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या अधिकृत वेबसाईटवर जा.

-  Instant PAN through Aadhaar हा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. 

- Get New PAN या पर्यायावर क्लिक करा.

- नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक विचारण्यात येईल. तिथे आपला आधार क्रमांक टाका.

- कन्फर्म सेक्शनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा.

- आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल.

- फोनवर आलेला ओटीपी भरून फॉर्म सबमिट करा.

- आयकर विभाग ही माहिती व्हेरिफाय करेल आणि दहा मिनिटांत e-PAN मिळेल.

 

टॅग्स :Pan Cardपॅन कार्डIndiaभारत