तुमची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे की कमी?; कशी ओळखणार, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 09:53 AM2021-05-19T09:53:12+5:302021-05-19T09:53:18+5:30

तज्ज्ञांच्या मते, ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमजोर आहे, त्यांना कोरोनाची लागण होण्याची जास्त शक्यता असते.

Is your immune system high or low ?; Learn how to recognize! | तुमची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे की कमी?; कशी ओळखणार, जाणून घ्या!

तुमची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे की कमी?; कशी ओळखणार, जाणून घ्या!

Next

संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक औषधे, परिसरातील विविध औषधी वनस्पतींचा काढा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमजोर आहे, त्यांना कोरोनाची लागण होण्याची जास्त शक्यता असते. कमीरोग प्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्यक्तींनी  घरा बाहेर जाऊच नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने सगळी काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

शरीरातल्या सफेद पेशी  (White Cells), ऍन्टीबॉडीज आणि इतर अनेक तत्व मिळून इम्युन सिस्टीम बनते. हिच इम्युन सिस्टीम आपलं व्हायरस पासून संरक्षण करते असं तज्ज्ञ सांगतात. ज्यांनी इम्युनीटी कमजोर असते असं लोक वातावरणात बदल झाल्यावरही लगेच आजारी पडतात. कोरोना संक्रमणाच्या काळात इम्युनिटीवर चर्चा केली जात आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी योगा, व्यायाम, चांगलं, जेवण आणि लाईफ स्टाईल असणं आवश्यक आहे, असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

कमजोर Immunity कशी ओळखणार?, जाणून घ्या!

  • डोळ्याखाली काळी वर्तूळ येणाऱ्यांची इम्युनिटी कमजोर असते.
  • रात्री पूर्ण झोप घेऊनही फ्रेश वाटत नसेल, तर, हे कमजोर इम्युनिटीचं लक्षण आहे. अशा मणसांमध्ये दिवसभर एनर्जी लेव्हल कमी असते. त्यांना सतत थकवा जाणवतो, झोप येत राहते.
  • अन्न पचन क्षमता कमजोर असते. डायजेशन चांगल नसल्याने पोटाशी संबंधीत समस्या येत असतात.
  • वातवरणातल्या बदलाचा शरीरावर लवकर परिणाम होत असेल. वातावरण बदललं की लगेज सर्दी, खोकला, ताप येत असेल तर, अशा लोकांची इम्युनिटी कमजोर असते.
  • कमजोर इम्युनिटीचं एक लक्षण म्हणजे, चिडचिडा स्वभाव. हे लोक कोणत्याना कोणत्या कारणाने चिडचीड करत असतात.

चांगली Immunity कशी ओळखणार?

  • चांगली Immunity असलेल्या लोकांना साध्या व्हारल इन्फेक्शनमध्ये औषधं घेण्याची गरज पडत नाही.
  • चांगली Immunity असलेल्या लोकांना सर्दी खोकला वारंवार होत नाही. झाला तरी लगेच बरा होतो.
  • चांगली Immunity असलेले लोक व्हायरल इन्फेक्शन आणि कोणत्याही छोट्या आजारात लगेच बरे होतात.

Web Title: Is your immune system high or low ?; Learn how to recognize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.