शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आपचा ‘ताप’ आणखी वाढला

By admin | Updated: May 4, 2015 23:19 IST

वादविवादांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आम आदमी पार्टीचा (आप) ताप आणखी वाढला आहे. आता पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने पक्षनेते कुमार विश्वास यांना आरोपीच्या

नवी दिल्ली : वादविवादांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आम आदमी पार्टीचा (आप) ताप आणखी वाढला आहे. आता पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने पक्षनेते कुमार विश्वास यांना आरोपीच्या पिंजऱ्यात खेचले आहे. कुमार यांनी त्यांच्या सोबत अनैतिक संबंधांबाबत पसरलेल्या खोट्या अफवा फेटाळल्या नसल्याने आपली प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या महिला कार्यकर्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली महिला आयोगाने विश्वास आणि त्यांच्या पत्नीला आज मंगळवारी पाचारण केले. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपने या मुद्यावरून आपविरुद्ध हल्लाबोल सुरू केला असतानाच पक्ष मात्र विश्वास यांच्या बाजूने उभा राहिला असून, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी पोलिसांवर टाकली. यावर पोलिसांनीही गुन्हा नोंदविण्यात आला असून चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना स्वतंत्र पत्राद्वारे यासंदर्भात माहिती दिली होती; परंतु दोघांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही, असा दावा या महिलेने केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तिने अमेठीत विश्वास यांच्यासाठी निवडणूक प्रचार केला होता. त्यानंतर विश्वास यांचे या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप झाला होता; परंतु विश्वास यांनी या आरोपांचे खंडन न केल्याने आपली प्रचंड बदनामी झाली असून खासगी आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी व्यथा तिने मांडली आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पक्षाच्या रॅलीत शेतकऱ्याची आत्महत्या, कायदेमंत्र्यांची बनावट पदवी, पक्षांतर्गत बंडाळी यामुळे पक्ष बेजार आहे. विश्वास यापूर्वीही महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधानांमुळे अडचणीत आले आहेत. या मुद्यावरून माध्यमांवर आगपाखड करताना माध्यमे भाजपच्या हातची खेळणी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विश्वास यांच्या सांगण्यानुसार कथित महिलेने १५ दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती; परंतु पोलिसांनी अद्याप यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे तिने कुमार यांना मेल करून आता मी काय करू, अशी विचारणा केली होती. पक्षाच्या कायदेविषयक समितीने तिला पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा सल्ला दिला होता. आयोगाची नोटीस अद्याप आपल्याला मिळाली नसून मिळाल्यानंतर आपण योग्य उत्तर देऊ, असे कुमार यांनी सांगितले.