'Your eyes do Yo Kajal', Dancer Sapna Chaudhary's entry to the Congress party Join | 'तेरी आंख्या का यो काजल', डान्सर सपना चौधरीचा काँग्रेस पक्षात प्रवेश
'तेरी आंख्या का यो काजल', डान्सर सपना चौधरीचा काँग्रेस पक्षात प्रवेश

नवी दिल्ली - हरयणाची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीनेकाँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हरियाणवी डान्सर सपना चौधरी मथुरा लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यासाठी सपना काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आज अधिकृतपणे सपना चौधरीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

सपना चौधरी यांना काँग्रेसकडू मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरविण्यात येऊ शकते. मथुरा मतदार संघातून आधीच भाजपने अभिनेत्री हेमा मालिनी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सपनाला काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास हेमा यांच्यासोबतची मथुरेतील लढत उत्सुकता वाढविणारी ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या सुपरहिट दंगलसाठी व्यासपीठ तयार होत आहे. 

भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार हेमा मालिनी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मथुरा मतदार संघात जाट समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायाची भूमिका कोणत्याही पक्षासाठी निर्णायक राहणार आहे. काँग्रेसकडून सपना चौधरीला तिकीट मिळाल्यास जाट मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसला मदत होईल. या व्यतिरिक्त पश्चिम उत्तर प्रदेशात सपना चौधरीचे फॅन फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहेत. सपनाला काँग्रेसने उमेदवारी दिल्यास हेमा मालिना यांना मथुरेत तगडे आव्हान मिळणार आहे. कारण, सपा-बसपा युतीकडून कुंवर नागेंद्र सिंह मैदानात आहेत. तेदेखील जाट नेते आहे. २०१४ मध्ये जाट मते एकगठ्ठा भाजपला मिळाले होते. परंतु ही मते विभागल्यास त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, सपना चौधरी या तेरी आंख्या को यो काजोल... मन करे से गोरी घायल.... या गाण्यामुळे देशभर पोहोचल्या असून महाराष्ट्रातही त्यांचे फॅन फॉलोवर्स आहेत. 

पश्चिम उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदार संघात जाट आणि मुस्लीम मतदारांचे वर्चस्व आहे. २०१४ मध्ये जाट आणि मुस्लीम मतदार वेगळे झाल्यामुळे युपीएलला फटका बसला होता. ही विभागणी रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. २०१४ च्या आकडेवारीनुसार मुथरा लोकसभा मतदार संघात १७ लाख मतदार आहेत. यामध्ये ९.३ लाख पुरुष असून सात लाख महिला मतदार आहेत.
 


Web Title: 'Your eyes do Yo Kajal', Dancer Sapna Chaudhary's entry to the Congress party Join
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.