शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"इतक्या गोळ्या घालेन की कोणी ओखणार नाही"; पेट्रोल पंपावर रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या तरुणीचा काँग्रेसकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:28 IST

उत्तर प्रदेशात पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखणाऱ्या तरुणीचा काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला आहे.

Hardoi Petrol Pump Viral Video:उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेट्रोल पंपावर एका तरुणीने तिच्या वडिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत तिथल्या कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. तरुणीने थेट रिव्हॉल्व्हर कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखली आणि त्याला धमकावले. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला आणि तिच्या वडिलांना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले. आता या तरुणीचा काँग्रेस आणि एआयएमआयएमने सत्कार केल्याचे समोर आलं आहे. 

उत्तर प्रदेशच्या बिलग्राम शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हरदोईच्या सांडी रोडवरील एचपी सीएनजी पेट्रोल पंपावर ही नाट्यमय घटना घडली. शहाबाद येथील एहसान खान त्यांची पत्नी आणि मुलगी अरीबा खान यांच्यासह रविवारी त्यांच्या गाडीत सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. सीएनजी भरत असताना एहसान खान आणि पंप कर्मचारी रजनीश कुमार यांच्यात वाद झाला. हा वाद इतरा वाढला, त्यानंतर कर्मचाऱ्याने एहसानच्या छातीवर धक्का दिला. वडिलांना धक्का दिल्यानंतर त्यांची मुलगी अरीबा संतप्त झाली आणि कारकडे धावत गेली. तिने गाडीतून रिव्हॉल्व्हर काढले आणि थेट कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखले.

पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या लोकांनी ताबडतोब मध्यस्थी केली आणि परिस्थिती आटोक्यात आणली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अरीबाने रजनीश कुमारला मी इतक्या गोळ्या झाडेन की तुझ्या कुटुंबातील लोकही तुला ओळखण्यास नकार देतील, अशी धमकी दिली. त्यानंतर रजनीश कुमार याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एहसान खान त्याची मुलगी आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. एहसान आणि अरीबाला ताब्यात घेण्यात आले आणि रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली.

या घटनेनंतर राजकारणही तापले आहे. हरदोई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम पांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी अरीबाच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. त्यांनी अरीबाला झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा फोटो दिला. प्रियंका गांधी वाड्रा यांचे "लड़की हूं, लड़ सकती हूं" हे घोषवाक्य येथे खरे होताना दिसत आहे, असेही विक्रम पांडे म्हणाले. त्यांनी अरिबाचे वडील एहसान यांना काँग्रेसच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस