शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने केली आत्महत्या,'अग्निपथ' योजनेमुळे होता नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:06 IST

Suicide Case :भरतीसाठी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात कटकसह ओडिशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे.

भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अग्निपथ योजनेमुळेच त्याने आत्महत्या केल्याचे मित्र आणि कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लष्करात भरतीसाठी घेतलेली लेखी परीक्षा रद्द झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. भरतीसाठी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात कटकसह ओडिशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे.बालासोर जिल्ह्यातील सोरोच्या तेंतई गावात राहणारा धनंजय मोहंती हा तरुण सैन्यात भरती होण्यासाठी मेहनत घेत होता. बुधवारी रात्री उशिरा त्याने छताला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. मीडियाशी बोलताना धनंजयचा मित्र पिताबस राज म्हणाला की, तो माझा चांगला मित्र होता. आम्ही गेल्या चार वर्षांपासून सैन्यात भरती होण्याची तयारी करत होतो. माझा मित्र धनंजय दीड वर्षापूर्वी फिजिकल फिटनेस टेस्ट पास झाला. त्यांना लष्कराकडून लेखी परीक्षेचे आश्वासन मिळाले होते. कोरोनाच्या काळात लेखी परीक्षा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर अग्निपथ योजनेमुळे ती रद्द करण्यात आली.या निदर्शनाची बातमी Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून मिळालीमित्राने सांगितले की, Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून त्याला कळले की, उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकाता येथील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. हा सर्व प्रकार पाहून धनंजयचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने काल रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मला मेसेज केला होता. या सरकारवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना कधीही मत देऊ नका, असे मित्र पिताबस म्हणाला. अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर लष्कराने लेखी परीक्षा रद्द केली, त्यामुळे मुलाने असे पाऊल उचलले, असा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. धनंजयच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबावर शोककळा पसरली. धनंजयच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना त्याचे अवयव दान करायचे होते. मात्र, सोरो रुग्णालयात अवयवदानाची सुविधा नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना ते करता आले नाही. शुक्रवारी देशाच्या अनेक भागात निदर्शने झालीइंडिया टुडेशी बोलताना बालासोर पोलिसांचे एसपी सुधांशू मिश्रा म्हणाले की, मला सोरोच्या घटनेची माहिती नाही, मृत्यूचे नेमके कारण तपासावे लागेल. चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्याच्या मोदी सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने सुरूच होती. दरम्यान, विविध राज्यांतील तरुणांच्या हिंसक निदर्शनांदरम्यान केंद्राने गुरुवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीची सर्वाधिक वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षे केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशSoldierसैनिक