प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:20 IST2025-09-29T15:19:32+5:302025-09-29T15:20:05+5:30
आपल्या कमाईच्या स्रोतांसंदर्भात स्पष्टीकरण देताना प्रशांत किशोर म्हणाले, “काही 'छुटभैया' नेत्यांनी आमच्या कमाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे प्रथम मी बिहारच्या जनतेला याचे उत्तर देतो...

प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी, त्यांच्या तीन वर्षांच्या कमाईसंदर्भात आणि पक्षाला मिळणाऱ्या निधीच्या स्रोतांसंदर्भात खुलासा केला आहे. तत्पूर्वी, बिहारमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार संजय जायसवाल यांनी किशोर आणि जन सुराज पक्षाच्या निधीच्या स्रोतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना, गेल्या तीन वर्षांत सल्लागार म्हणून आपण २४१ कोटी रुपये कमावले. यांपैकी ९८.७५ कोटी रुपये आपण स्वत:च्या खात्यातून जन सुराज पक्षाला डोनेट केले आहेत, असे किशोर यांनी म्हटले आहे. ते सोमवारी पाटणा येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते.
बिहारच्या चोर नेत्यांना सर्व चोरच वाटतात -
आपल्या कमाईच्या स्रोतांसंदर्भात स्पष्टीकरण देताना प्रशांत किशोर म्हणाले, “काही 'छुटभैया' नेत्यांनी आमच्या कमाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे प्रथम मी बिहारच्या जनतेला याचे उत्तर देतो. प्रशांत किशोर व्यंगात्मक स्वरात म्हटले, ज्याप्रमाणे श्रावनाच्या आंधळ्याला सर्व काही हिरवेच दिसते, त्याचप्रमाणे बिहारच्या चोर नेत्यांना सर्व चोरच वाटतात.”
पैसा सरस्वतीने येतो, आम्ही ज्यांना सल्ला देतो, मग ते... -
पुढे सविस्तर खुलासा देत प्रशांत किशोर म्हणाले, “पैसा सरस्वतीने येतो. आम्ही ज्यांना सल्ला देतो, मग ते व्यक्ती असो वा कंपनी, त्यांच्याकडून फीस घेतो. २०२१-२२ पासून तीन वर्षांत माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या खात्यात २४१ कोटी रुपये फी म्हणून आले आहेत. यावर ३०.९५ कोटी जीएसटी आणि २० कोटी आयकर भरला आहे. तसेच, उरलेल्या रकमेतून ९८.७५ कोटी रुपये जन सुराज पक्षाला डोनेट केले आहेत.”