आता पोलिसांना हक्काचा वीकली ऑफ मिळणार; सरकारचं मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:43 IST2019-08-16T17:42:49+5:302019-08-16T17:43:43+5:30

सरकारनं पोलिसांना एक खूशखबरी दिली आहे.

yogi govt decision on up police weekly off | आता पोलिसांना हक्काचा वीकली ऑफ मिळणार; सरकारचं मोठं गिफ्ट

आता पोलिसांना हक्काचा वीकली ऑफ मिळणार; सरकारचं मोठं गिफ्ट

लखनऊः सरकारनं पोलिसांना एक खूशखबरी दिली आहे. योगी सरकारनं उत्तर प्रदेश पोलिसांना एक सुखद धक्का दिला आहे. आता पोलिसांना प्रत्येक आठवड्याला हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांनी अशा सुट्टीची मागणी केली होती. त्याप्रमाणेच योगी सरकारनं पोलिसांना वीकली ऑफ देण्याचं जाहीर केलं आहे. सणासुदीला पोलीस कोणतीही सुट्टी न घेता दिवसरात्र पहारा देत असतात.

सुट्टी न घेता काम केल्यानं पोलिसांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचंही निदर्शनास आलं होतं. पोलिसांना काही महत्त्वाची ड्युटी लागल्यावर बऱ्याच काळासाठी घरीसुद्धा जाता येत नाही. त्यामुळे कुटुंबीयांमधील वातावरण गढूळ होतं. फिरतीवर असलेले पोलीस असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारे पोलीस नेहमीच त्रासलेले असायचे.

अशा पोलिसांमध्ये अनेकदा वाद आणि बाचाबाची होत असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांचं मानसिक संतुलन ठीक राहण्यासाठी त्यांना आता आठवड्याचा वीकली ऑफ देण्यात आला आहे. 

Web Title: yogi govt decision on up police weekly off

टॅग्स :Policeपोलिस