"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:53 IST2025-11-10T18:52:30+5:302025-11-10T18:53:25+5:30
"ज्या बिहारने नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश प्रसारित केला, त्याच बिहारला काँग्रेस-राजद आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेकडे ढकलले. आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमीला या पक्षांनी जातीयवाद आणि माफियागिरीने कलंकित केले."

"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी अररिया जिल्ह्यातील नरपतगंज हायस्कूल स्टेडियमवर आयोजित सभेत काँग्रेस, राजद आणि समाजवादी पक्षावर थेट निशाणा साधला. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या सभेत ते म्हणाले, बिहारमध्ये पुन्हा "जंगलराज" आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थांबवणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, “पंक्चर बनवणाऱ्यांची, येथे येऊन विकासालाही पंक्चर करण्याची इच्छा आहे. नरपतगंजला ‘घुसखोरांचे लॉन्चिंग पॅड’ बनू देणार नाही, असा इशाराही येगी यांनी यावेळी दिला.
योगी पुढे म्हणाले, ज्या बिहारने नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश प्रसारित केला, त्याच बिहारला काँग्रेस-राजद आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेकडे ढकलले. आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमीला या पक्षांनी जातीयवाद आणि माफियागिरीने कलंकित केले. त्यांच्या कारभारामुळेच बिहार ‘बीमारू’ झाले होते.
यूपीतील कायदा-सुव्यवस्थेचा उल्लेख करताना योगी म्हणाले, “उत्तर प्रदेशात माफियांवर बुलडोझर चालवले जाते. त्यांची हाडे खिळखिळी केली जातात. माफियांनी बळकावलेल्या जमिनींवर आता गरीबांसाठी घरे बांधली जात आहेत. काँग्रेस-राजद आघाडी जातीय तणाव वाढवून समाजात फूट पाडण्याचे काम करते. बिहार काँग्रेस-राजदच्या जाळ्यातून बाहेर आल्यानंतरच विकासाचा मार्ग खुला झाला.
“यूपीमध्ये ना कर्फ्यू, ना दंगा, सर्वच 'चंगा',” असेही योगी म्हणाले. अयोध्येतील राममंदिराचा उल्लेख करत योगी म्हणाले की एनडीए जे म्हणते ते करून दाखवते. काँग्रेस आणि राजदने रामभक्तांना विरोध केला, पण आज अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान आहेत. यावेळी योगींनी नरपतगंजवासीयांना एनडीएच्या उमेदवार देवंती यादव यांना विजयी करण्याचे आवाहनही केले.