शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

होळीनंतर होणार योगींचा शपथविधी; उद्या नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांची भेट घेणार, सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 1:04 PM

Yogi Adityanath : मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळा होळीनंतर होणार आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) रविवारी म्हणजेच उद्या दिल्लीत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशामध्ये स्थापन होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी दोन्ही नेत्यांना आमंत्रित करणे, हा या बैठकीचा उद्देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळा होळीनंतर होणार आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पहिला कार्यकाळ संपला आणि त्यांनी लखनऊच्या राजभवनात औपचारिकपणे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाला आहे. 

भाजपने जिंकल्या 255 जागाउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये  (UP Election Result) निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री उशिरा 403 जागांवर निवडणूक निकाल जाहीर केला, ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह 273 जागा जिंकल्या आणि पूर्ण बहुमत मिळवले. या निवडणुकीत भाजपने 255 जागा जिंकल्या, तर अपना दल 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. याचबरोबर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपला 41.29 टक्के, तर समाजवादी पक्षाला 32.06 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते मिळाली आहेत.

योगी आदित्यनाथ जिंकले, केशव प्रसाद मौर्य पराभूतमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर (Yogi Adityanath win from Gorakhpur Sadar) विधानसभेची जागा एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकली. मात्र, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघात सात हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी पराभव केला.  पल्लवी पटेल यांना 1,06,278 मते मिळाली तर केशव प्रसाद मौर्य यांना 98,941 मते मिळाली.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२J P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदी