शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

योगींची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड, उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:17 IST

Yogi Adityanath Oath Ceremony: आता योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

लखनऊ : योगी आदित्यनाथ यांची आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते सुरेश खन्ना यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. लखनऊ येथील लोकभवनात झालेल्या या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक अमित शाह, रघुबर दास आणि भाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान हेही उपस्थित होते.

आता योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता योगी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. याआधी योगी आदित्यनाथ गुरुवारी दिल्लीत पोहोचले होते. येथे त्यांनी सरकार स्थापनेबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. तसेच, भाजप केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवू शकते. जवळपास 46 मंत्री शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, योगी सरकारच्या (Yogi Government) दुसऱ्या टर्मचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उद्योगपती तसेच साधू संतांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलीवूडचे (Bollywood) सिनेस्टारही उपस्थित राहणार आहेत. 

उद्योगपती आणि 49 कंपन्यांनाही निमंत्रणयोगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि 49 कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल.

भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची यादी...शिवराज सिंह चौहान – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीमनोहर लाल खट्टर- हरयाणाचे मुख्यमंत्रीपेमा खांडू - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीएम एन वीरेन सिंग – मणिपूरचे मुख्यमंत्रीजय राम ठाकूर - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विप्लब देवजी - त्रिपुराचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत – गोव्याचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा- आसामचे मुख्यमंत्री श्रीबसवराज बोम्मई - कर्नाटकचे मुख्यमंत्रीभूपेंद्र पटेल - गुजरातचे मुख्यमंत्रीपुष्कर सिंह धामी – उत्तराखंडचे मुख्यमंत्रीतारकेश्वर सिंह - बिहारचे उपमुख्यमंत्रीरेणू देवी - बिहारच्या उपमुख्यमंत्रीवाईपॅटन - नागालँडचे उपमुख्यमंत्रीचोनामीन - अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्रीजिष्णु देव वर्मा जी- त्रिपुराचे उपमुख्यमंत्री

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAmit Shahअमित शाहUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२