Yogguru Ramdev Baba will write Biography | योगगुरू रामदेव बाबा लिहणार आत्मचरित्र

योगगुरू रामदेव बाबा लिहणार आत्मचरित्र

नवी दिल्ली - चांगल्या-चागल्या कंपन्यांना धूळ चारणारे योगगुरू रामदेवबाबा आता आत्मचरित्र लिहणार आहे. ‘माय लाईफ माय मिशन’ असे या आत्मचरित्राचे नाव आहे. यात बाबा त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल सांगणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर हे या आत्मरित्राचे सहलेखन करणार आहेत.

तेल,साबण, शॅम्पू, डाळी, कडधान्य, वस्त्रोद्योगात भरारी घेऊन नावाजलेल्या कंपन्यांना माघे टाकणारे रामदेवबाबा यांच्या आयुष्याच्या प्रवास आता जगासमोर येणार आहे. ‘माय लाईफ माय मिशन’ असे या आत्मचरित्रमधून रामदेवबाबा यांची जीवन कहाणी आता त्यांच्याच शब्दात वाचायला मिळणार आहेत. पैंगुईन रॅंडम हाऊस हे प्रकाशक बाबांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहेत. ऑगस्टमध्ये हे आत्मचरित्र बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबबत खुद्द रामदेवबाबा यांनी टि्वट केले आहे.


बाबांच्या, आत्मचरित्रमध्ये, हरयाणातील एका छोट्या गावापासून ते आंतरराष्ट्रीय मंचापर्यंतचा बाबारामदेव यांचा प्रवास यात वाचकांना वाचायला मिळणार आहे. आपले शत्रु आणि मित्र यांच्याबद्दलही बाबांनी आत्मचरित्रात मनमोकळेपणे लिहले आहे. त्याचबरोबर स्वदेशी व पतंजलीच्या व्यवसायाबद्दलही बाबांनी यात आपले अनुभव कथन केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर हे या आत्मरित्राचे सहलेखन करणार आहेत. रामदेवबाबा यांचे आत्मचरित्र ऐमज़ॉन वर सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. दरम्यान, बाबांच्या आत्मचरित्राचे लेखन करायला मिळणे हा माझ्या जीवनातील महत्वाचा अनुभव आहे. असे माहुरकर यांनी म्हटले आहे.


 

Web Title: Yogguru Ramdev Baba will write Biography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.