योगेश्वर दत्तचे ते घाणेरडे हसू मनावर कोरले गेले..., विनेश फोगटचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 06:17 IST2023-06-24T06:17:38+5:302023-06-24T06:17:57+5:30

विनेश फोगट हिने आरोप केला की, जेव्हा महिला कुस्तीपटू समितीसमोर आपली आपबीती सांगत असत तेव्हा तो खूप वाईट रीतीने हसायचा.

Yogeshwar Dutt's dirty words were etched on his mind..., Vinesh Phogat's strong counterattack | योगेश्वर दत्तचे ते घाणेरडे हसू मनावर कोरले गेले..., विनेश फोगटचा जोरदार पलटवार

योगेश्वर दत्तचे ते घाणेरडे हसू मनावर कोरले गेले..., विनेश फोगटचा जोरदार पलटवार

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने आंदोलक कुस्तीपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये मिळालेल्या सूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर महिला कुस्तीपटू विनेश फोगट प्रचंड भडकली. जेव्हा मी योगेश्वर दत्तचा व्हिडीओ ऐकला, तेव्हा त्याचे ते घाणेरडे हसू माझ्या मनात घर करून गेले. महिला कुस्तीपटूंसाठी बनवलेल्या दोन्ही समित्यांचा तो एक भाग होता, असे ती म्हणाली.

विनेश फोगट हिने आरोप केला की, जेव्हा महिला कुस्तीपटू समितीसमोर आपली आपबीती सांगत असत तेव्हा तो खूप वाईट रीतीने हसायचा. तो म्हणाला की, ब्रिजभूषण यांना काही होणार नाही, जा आणि तुमचा सराव करा. दुसऱ्या एका महिला कुस्तीपटूला अतिशय अश्लील शब्दात सांगितले की, इतका मोठा मुद्दा बनवू नका.

Web Title: Yogeshwar Dutt's dirty words were etched on his mind..., Vinesh Phogat's strong counterattack