शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जयमल्हार श्री खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला़ येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात बेल भंडार्‍यांची उधळण करण्यात भाविक दंग झाले होते़ एकीकडे भाविक भक्तीभावात दंग झालेले असताना राजकीय मंडळी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले होते

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला़ येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात बेल भंडार्‍यांची उधळण करण्यात भाविक दंग झाले होते़ एकीकडे भाविक भक्तीभावात दंग झालेले असताना राजकीय मंडळी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले होते
माळेगाव यात्रेसाठी दोन दिवसांपासून व्यापारी माळेगावात दाखल झाले आहेत़ शनिवारी भक्तांनी सकाळपासूनच श्री खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातून भाविक आले होते. परंपरेनुसार खंडोबा देवस्थानातून पालखी काढण्यात आली. यावेळी पारंपारिक वाद्याच्या गजरात बेलभंडार, खोबर्‍याची उधळण करण्यात आली. जिल्हा परिषदेच्यावतीने या पालखीचे पुजन शासकीय विश्रामगृहात करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्षा मंगला गुंडीले, खा. सुनिल गायकवाड, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. विनायक पाटील, जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान माळेगाव यात्रेत राजकीय कुरघोडीलाही प्रारंभ झाला. जि.प. पदाधिकार्‍यांमध्ये बेबनावही उघडपणे दिसून येत होता. जिल्हा परिषदेच्यावतीने श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत विविध विविध स्टॉल लावण्यात आले.
माळेगाव यात्रेत जनावरांचा बाजारही मोठ्या प्रमाणात भरल्या जातो. उंट, घोडे यासह विविध जनावरे, पशुपालक दाखल झाले आहेत.