शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पूर्ण होतील सात सिंचन प्रकल्प

By admin | Updated: May 12, 2016 03:56 IST

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०२० पर्यंत एकूण ९९ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येईल. हे प्रकल्प त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) पूर्ण करण्यात येत आहेत

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीपंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०२० पर्यंत एकूण ९९ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येईल. हे प्रकल्प त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) पूर्ण करण्यात येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा अंदाजित खर्च ३६२९८ कोटी रुपये आहे. या २६ पैकी ७ प्रकल्प चालू वर्षातच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जल संसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. प्रा. जाट म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रातील वाघूर (खर्च १२३३ कोटी रुपये), बावनथडी (आयएस) (७३९ कोटी), लोअर दुधना (१५५२ कोटी), तिल्लारी (६५६ कोटी), लोअर वर्धा (१९१२ कोटी), लोअर पंजारा (२९५ कोटी) आणि नांदूर मधमेश्वर, दुसरा टप्पा (२०.५० कोटी) हे सात सिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील. या प्रकल्पांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.याशिवाय २०२० पर्यंत ज्या सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे, त्यात गोसेखुर्द (एनपी) (खर्च १३३६६ कोटीे), अप्पर पैनगंगा (१५१२ कोटी), बेंबळा (३०५७ कोटी), तराळी (८१६ कोटी), धोम बालकवाडी (७५१ कोटी), अर्जुना (६४२ कोटी रुपये), अप्पर कुंडलिका (२७४ कोटी), अरुणा (५८८ कोटी), कृष्णा कोयना लिफ्ट (२३२८ कोटी), गडनदी (३७.५५ कोटी), सांगोला शाखा कालवा (८०६ कोटी), खडकपूर्णा १३४८ कोटी), वारणा (१०६३ कोटी), मोरना (गुरेघर) (१८३ कोटी), लोअर पेंदी (१०७१ कोटी), वांग प्रकल्प (१९४ कोटी), नरदेव (मोहम्मदवाडी) (२५३ कोटी) आणि कडिली (३२४ कोटी) यांचा समावेश आहे, असे प्रा. जाट यांनी सांगितले.