शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तिहारमधील जेल नंबर ७ यासीन मलिकचे नवे ठिकाण असेल, अशी आहे सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 21:18 IST

Yasin Malik : तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही.

नवी दिल्ली :  काश्मिरी फुटीरवादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुरुंगात त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, यासिन मलिकला तिहारमध्ये कडेकोट बंदोबस्तात एका वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “सुरक्षेच्या कारणास्तव मलिक याला तुरुंगात कोणतेही काम सोपवले जाऊ शकत नाही. त्याला कडेकोट बंदोबस्तात कारागृह क्रमांक सातमधील एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच्या सुरक्षेवर नियमितपणे लक्ष ठेवले जाईल.”तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यापूर्वीच मलिकला एका वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते, जिथे तो तुरुंग क्रमांक सातमध्ये एकटाच राहत होता. दिल्लीच्या एका न्यायालयाने बुधवारी यासीन मलिकला दहशतवादासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याने केलेल्या गुन्ह्यांचा उद्देश "भारताच्या विचारसरणीवर हल्ला करणे" आणि जम्मू-काश्मीरला भारत संघापासून जबरदस्तीने वेगळे करणे हे होते आणि त्याला करायचेही होते. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी UAPA आणि भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या अटी सुनावली.

फाशीपासून वाचला, NIA कोर्टाने यासिन मलिकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

यासिन मलिकला जन्मठेप होताच पाकिस्तानचा तिळपापड, पंतप्रधानांनी भारताविरोधात उधळली मुक्ताफळे तसेच 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहेकाल एनआयए कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासोबतच 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी हा निकाल दिला. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्वानपथकानेही न्यायालयात आणून तपासणी केली. यासिन मलिकला दोन खटल्यांमध्ये जन्मठेपेची आणि वेगवेगळ्या खटल्या आणि कलमांत प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादjailतुरुंगJammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालय