शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अजित डोवालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यशवंत सिन्हांचा नरेंद्र मोदींवर नेम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 4:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला आहे.

ठळक मुद्देअजित डोवाल यांना मोदी सरकार - 2 ने मोठी भेट दिली आहे. यशवंत सिन्हा यांनी अजित डोवाल यांच्या नियुक्तीवरून मोदींना कानपिचक्या दिल्यात.७५+ नेत्यांना मंत्रिपद न देण्याची भूमिकाही मोदी-शहा जोडीनं घेतली होती.

उरी दहशतवादी हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकचे आणि पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकचे 'मास्टरमाईंड' अजित डोवाल यांना मोदी सरकार - 2 ने मोठी भेट दिली आहे. आणखी पाच वर्षं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला आहे. डोवाल यांची चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि धाडसी वृत्तीचा अनुभव सगळ्यांनाच आल्यानं केंद्राच्या निर्णयाचं कौतुक होतंय. परंतु, भाजपाचे बंडखोर नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी या फेरनियुक्तीवरून मोदींना कानपिचक्या दिल्यात.

'अजित डोवाल यांचं वय ७४ वर्षं आहे. त्यांना पाच वर्षांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केलं गेलंय आणि कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला गेलाय. बहुधा, खासदार आणि मंत्र्यांना जो नियम लागू आहे, तो कॅबिनेट रँकसाठी नसावा. बिचाऱ्या सुमित्रा महाजन', अशी ट्विप्पणी यशवंत सिन्हा यांनी केली आहे. 

अजित डोवाल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदींवर निशाणा साधण्याचाच प्रयत्न यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ७५ वर्षं पूर्ण केलेल्या नेत्यांना तिकीट न देण्याचा एक अलिखित नियम भाजपामध्ये 'मोदी सरकार-1' दरम्यान झाला आहे. ७५+ नेत्यांना मंत्रिपद न देण्याची भूमिकाही मोदी-शहा जोडीनं घेतली होती. त्याच नियमाच्या आधारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं गेलं. त्यावरून पक्षातील एक वर्ग दुखावला गेला होता. यशवंत सिन्हा हे त्यापैकीच एक. अर्थात, लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामी उसळल्यानंतर मोदींबद्दलची पक्षांतर्गत नाराजी कमी झाली आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेऊन मोदींनी उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला आहे. परंतु, सिन्हा यांनी ट्विटद्वारे पुन्हा वयाचा, ज्येष्ठतेचा आणि न्याय-अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवालLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीSumitra Mahajanसुमित्रा महाजनYashwant Sinhaयशवंत सिन्हा