शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

एक्स गर्लफ्रेंडने केला ‘जैश- ए- मोहम्मद’च्या टॉप कमांडरचा 'गेम', 'जहन्नूम' होता कोडवर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 06:57 IST

खालिदचं उत्तर ऐकून तिला धक्का बसला, त्यानंतर ती बहिणीसोबत थेट जालंधरला पोहोचली खालिदने आयुष्य जहन्नुम बनवलं या रागातून त्याच तरूणीने हा कोडवर्ड ठेवला होता.

ठळक मुद्देखालिदने आयुष्य जहन्नुम बनवलं या रागातून त्याच तरूणीने हा कोडवर्ड ठेवला होता. खालिद आज मला भेटायला येऊ शकतो अशी माहिती पोलिसांना देताना तिने त्याचा उल्लेख जहन्नूम केला होता. 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी सीमा सुरक्षा दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अबू खालिदला कंठस्नान घालण्यात आले. खालिदच्या एक्स गर्लफ्रेंडने दिलेल्या माहितीमुळेच त्याचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती आता समोर येत आहे. 

खालिदने प्रेमात धोका दिल्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी तिने पोलिसांना  त्याच्याबाबत माहिती दिली.  खालिदबाबत माहिती देण्यासाठी जहन्नूम हा कोडवर्ड ठेवण्यात आला होता अशी माहिती आहे. खालिदने आयुष्य जहन्नुम बनवलं या रागातून त्याच तरूणीने हा कोडवर्ड ठेवला होता. खालिद आज मला भेटायला येऊ शकतो अशी माहिती पोलिसांना देताना तिने त्याचा उल्लेख जहन्नूम केला होता. का केला खालिदचा गेम?इंडियाटुडेने दिलेल्या वृत्तानुसार, वर्षभरापूर्वी आपण गर्भवती असल्याचं तरूणीच्या लक्षात आलं. याबाबत तिने खालिदला सांगितलं तर त्याने तिच्याशी थेट संबंध तोडला. मला तुझ्याशी आणि तुझ्या पोटातील बाळाशी काही देणंघेणं नाही असं तो तिला म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून तिला धक्का बसला, त्यानंतर ती बहिणीसोबत थेट जालंधरला पोहोचली आणि तिथे इच्छा नसताना गर्भपात केला. त्यानंतर खालिदचा बदला घ्यायचा याच रागातून ती परतली आणि खालिद आज सकाळी मला भेटायला येऊ शकतो अशी माहिती देऊन तिने खालिदचा गेम केला. माहिती मिळाल्यानंतर बारामुल्लाच्या लाडोरा येथे सैन्याच्या तुकडीने खलिदला घेरले होते.अनेक तरूणींशी संबंध-या तरूणीव्यतिरीक्त खालिदचे अनेक तरूणींसोबत संबंध होते. त्याने तीन ते चार तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धोका दिला होता अशी माहिती आहे. कोण होता खालिद ?खालिद हा मूळचा पाकिस्तानचा असून त्याने पाकिस्तानमध्येच दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली होती.  खालिद हा जैश-ए- मोहम्मदचा उत्तर काश्मीरमधील ऑपरेशनल कमांडर होता.  खालिद ऑक्टोबर 2016 पासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. बारामुल्ला येथे ‘जैश’चे मॉड्युल सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केले होते. यात खलिदचे नावही समोर आले होते. गेल्या आठवड्यात श्रीनगरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर ‘जैश’च्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात तीन जवान जखमी झाले होते. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. खालिद या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, असे समजते. मॉस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.

टॅग्स :Jaish e Mohammadजैश ए मोहम्मदTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिरBSFसीमा सुरक्षा दल