शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

'चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत आहेत, अफवांवर विश्वास ठेऊ नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 7:52 PM

हिमाचल प्रदेशच्या किनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते.

मुंबई - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती उत्तम असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे गडकरी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सांगण्यात आले आहे. गडकरी यांची प्रकृती उत्तम असून शिमला येथील रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची नियमित तपासणी केली असल्याचेही या अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे. त्यामुळे गडकरी यांच्या प्रकृतीबाबत पसरविण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

हिमाचल प्रदेशच्या किनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते. यादरम्यान गडकरींची प्रकृती अचानक बिघडली. गडकरी हे छराबडा येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिमल्याहून आयजीएमसीचे डॉक्टरांचे एक पथक तातडीने छराबडा रवाना झाली होती. त्यामुळे गडकरींची प्रकृती बिघडली, अशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. तसेच, अनेक न्यूज पोर्टलवरही आल्या होत्या. मात्र, याबाबत गडकरींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे. तसेच गडकरी यांची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही नितीन गडकरी यांची प्रकृती बिघडली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तर, याआधीही अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. कार्यक्रमात जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले होते. त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ आल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीही विश्रांतीचा सल्ला दिला आहे. नितीन गडकरी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीTwitterट्विटरhospitalहॉस्पिटल