कामगार हृदयविकाराच्या झटक्याने तडफडत होता, मालक बाजूलाच 'मोबाईल'वर टाईमपास करत होता; धक्कादायक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:39 IST2025-10-13T12:34:11+5:302025-10-13T12:39:28+5:30
मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात, एका दुकानातील कर्मचाऱ्याचा काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कामगार हृदयविकाराच्या झटक्याने तडफडत होता, मालक बाजूलाच 'मोबाईल'वर टाईमपास करत होता; धक्कादायक व्हिडीओ
एका मोठ्या दुकानात काही कामगार काम करत होते. एक कामगार अचानक खुर्चीवर जाऊन बसला, यावेळी तो कामगार हृदयविकाराच्या झटक्याने तडफडत होता. सगळ्यांना तो कामगार सहज खुर्चीवर बसल्याचे वाटले. बाजूलाच त्या दुकानाचा मालक मोबाईलवर टाईमपास करत बसला होता. तडफडत असलेल्या कामगाराकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. कोणीही त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याचा किंवा काय झाले आहे. हे पाहण्याचा प्रयत्न केला नाही. त्या कामगाराचा जागीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
ही घटना मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील आहे. एका कर्मचाऱ्याला दुकानात काम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. जर त्या कर्मचाऱ्याला वेळेवर रुग्णालयात घेऊन गेले असते तर त्याचा जीव वाचला असता. हृदयविकाराच्या झटक्याने कर्मचारी वेदनेने तडफडत होता, तर दुकान मालक त्याच्या खुर्चीवरून उठतही नाही आणि त्याचा मोबाईल फोन वापरत राहतो.
मालक खुर्चीवरुन उठलाही नाही
यावेळी इतर कर्मचारी मदत करण्यासाठी घटनास्थळी धावले. एका कर्मचाऱ्याने त्याला पाणी आणले, तर इतरही आले, परंतु दुकान मालक फोनवरच होता, तो जाग्यावरुन उठलाही नाही.
रुग्णालयात घेऊन जाण्याआधीच मृत्यू झाला
त्या कर्मचाऱ्याचा रुग्णालयात घेऊन जाण्याआधीच मृत्यू झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने मानवतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एक माणूस जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंजत होता, तर जवळच्या लोकांनी मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. वेळीच त्यांच्याकडे लक्ष दिले असते तर आज त्यांचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली आहे.