women were also involved in nizamuddin markaz caught five in  kushinagar sna | तबलिगी जमात : निजामुद्दीन मरकजमध्ये महिलाही झाल्या होत्या सहभागी, पाच जणींवर गुन्हा दाखल

तबलिगी जमात : निजामुद्दीन मरकजमध्ये महिलाही झाल्या होत्या सहभागी, पाच जणींवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देया पाचही महिला पूर्वी पकडण्यात आलेल्या जमांतींच्या पत्नीपती पकडले गेल्यानंतर घरातच लपून होत्या या महिलाया महिलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे

कुशीनगर - दिल्‍लीतील निमामुद्दीन मरकजमध्ये  महिलांचाही समावेश होता. गुप्तचर संस्थांकडून इनपूट मिळाल्यानंतर कुशीनगरमध्ये शोध घेण्यात आला. यात मरकजमध्ये गेलेल्या पाच महिला पोलिसांना आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालात पाठवले आहे. येथे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. या महिलांचे पतीही निजामुद्दीन मरकजमध्ये गेले होते. 

कुशीनगर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा येथील अमवा जंगल येथून या महिलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ज्या घरातून या महिलांना ताब्यात घेण्यात आले, त्याच घरातून दोन दिवसांपूर्वी दोन जमाती पकडण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात या महिलांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत. 

पती पकडले गेल्यानंतर घरातच लपून होत्या या महिला -

कुशीनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकजमधून आलेल्या एकूण पाच तबलिगी जमातच्या लोकांना रविवारी आणि सोमवारी पकडण्यात आले होते. यांच्यासोबत महिलाही होत्या, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने संभाव्य ठिकाणी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. या शोध मोहिमेत पोलिसांना रात्री उशीरा यश मिळाले. यात पोलिसांनी अमवा जंगल येथून, राहिमा खातून (रहिवासी - दीवान पाडा, बीमारू गुरी, जिल्हा नागौन), शाकिना खातून (रहिवासी - पेनिगॉन, कछलखुआ, जिल्हा नागौन, आसाम), जाहुरा खातून (रहिवासी - कुठाढी, जिल्हा नागौन, आसाम), रजीफा खातून (रहिवासी - कुबीर डूबी, जिल्हा होजई, आसाम), आणि एफ खातून (रहिवासी - कंडूली मारी, जिल्हा नागौन, आसाम), या पाच जणींना पकडले आहे. पती पकडले गेल्यानंतर त्या याच घारत लपून बसल्या होत्या.

मदत करणाऱ्यांना पोलिसांनी यापूर्वीच पकडले आहे -

दोन दिवसांपूर्वी रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी अमवा जंगल गावात एका घरावर छापेमारी केली. आसाममधील नागौन येथील हाशिम, तसेच आसाममधील होजई जिल्ह्यातील कामपूर येथील यशोधर अलीला पकडण्यात आले आहे. यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मरजमधून आल्यानंतर हे  दोघे  पडरौना येथे पोहोचले होते. पोलिसांनी त्यांना मदत करणाऱ्या सलाउद्दीन, साहील, खुदाद्दीन, शाकिर अली आणि हाजी हमीद यांच्याविरोधात कलम 188, 269, 271 आयपीसी अंतर्गत 51 बी आपत्ती निवारण आधिनीयम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सोमवारी सायंकाळी नागौन जिल्ह्यातील सालमा बोरी येथील अब्दुल सलाम आणि कांदोमली गडी झूरिया येथील फकरूद्दीन यांना पकडण्यात आले होते. निजामुद्दीन मरकजमध्ये गेल्याचे या दोघांनीही मान्य केले आहे. तसेच या दोघांसह असणाऱ्या नागौन सदर आसाम येथील ऐनुलहक याने स्वतःच पडरौना पोलीस ठाण्यात जाऊन आपणही मरकजमध्ये गेलो होतो याची कबुली दिली आहे.  

एएसपी ए. पी. सिंह यांनि दिलेल्या माहितीनुरास आता पकडण्यात आलेल्या या महिला पूर्वी पकडण्यात आलेल्या जमांतींच्या पत्नी आहे. हे सर्व दिल्‍लीच्या निजामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झाले होते आणि येथे लपून रहात होते. सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करम्यात आला आहे. या जमातींना मदत करणाऱ्या रहमतुल्लाह आणि त्यांची पत्नी शकिरूनिशा यांच्या विरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांचा तपास सुरू आहे.

Web Title: women were also involved in nizamuddin markaz caught five in  kushinagar sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.