शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'मला शिक्षा द्या, पण पोलिसांवर कारवाई करू नका'; प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:00 AM

आग्र्याच्या पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या.

नवी दिल्ली:आग्रा येथे पोलिस कोठडीत अरुण वाल्मिकी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आग्र्याला जाणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला यूपी पोलिसांनी लखनऊ-आग्रा महामार्गावर रोखलं आणि ताब्यात घेतलं. पण, यावेळी काही महिला पोलिसांनी प्रियांका गांधींसोबत सेल्फी/फोटो काढले. आता या फोटोवरुनच प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

प्रियंका गांधींचे महिला पोलिसांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियांका गांधी यांनी महिला पोलिसांसोबत सेल्फी क्लिक केल्यानंतर एक ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, "मी ऐकलंय की, योगी जी हे फोटो पाहून इतके अस्वस्थ झाले की त्यांना या महिला पोलिसांवर कारवाई करायची आहे. माझ्याबरोबर फोटो काढणे गुन्हा असेल तर मला त्याची शिक्षा झाली पाहिजे. या मेहनती आणि निष्ठावान पोलिसांची कारकीर्द खराब करणे सरकारला शोभत नाही.''

दोनदा प्रियंका गांधींना ताब्यात घेतलंपीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना प्रियंका गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यांना ताब्यात घेतलं. पण, काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अखेर प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. विशेष म्हणजे, या महिन्यात पोलिसांनी दुसऱ्यांदा प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं आहे. याआधी लखीमपूर खेरीमध्ये पोलिसांनी पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाताना काँग्रेस सरचिटणीसांसह सर्व नेत्यांना ताब्यात घेतलं होतं.

नेमकं प्रकरण काय आहे ?17 ऑक्टोबर रोजी आग्रा येथील जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या मालखान्यातून 25 लाख रुपये गायब झाल्याप्रकरणी पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्याला पकडलं होतं. पण, नंतर त्याचा मृत्यू झआला. नातेवाईकांनी पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात, एसएसपीने 5 पोलिसांना निलंबित केलं आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेसagra-pcआग्रा