शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिलांचे कायदे पतीचा सूड घेण्यासाठी नाहीत; दुरुपयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा चिंता व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 09:35 IST

पतीची घटस्फोटाची याचिका भोपाळहून पुणे कोर्टात हस्तांतरित करण्यासाठी पत्नीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्त्रियांच्या हातातील कायद्याच्या कठोर तरतुदी त्यांच्या कल्याणासाठी आहेत. पतीला शिक्षा देणे, धमकावणे, वर्चस्व गाजवणे किंवा जबरदस्ती करण्यासाठी नाहीत. हे समजून महिलांनी याचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.भोपाळचा रहिवासी व अमेरिकन नागरिक पती आणि पुण्याच्या उच्च शिक्षित पत्नीचा २०२१ मध्ये विवाह झाला. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. पतीचे पूर्वीच्या लग्नापासून झालेल्या मुलांशी संबंध ठेवणे आणि आजारी वडिलांची काळजी घेण्यावरुन लग्नानंतर थोड्याच दिवसांत पती-पत्नीत मतभेद निर्माण झाले. पतीने घटस्फोटासाठी तीन वेळा याचिका दाखल केल्या. दुसरीकडे, पत्नीने क्रूरता, विनयभंग, बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणूक आरोपाचे अनेक गुन्हे पती आणि त्याच्या वडिलांविरुद्ध दाखल केले. पतीविरुद्ध लूक आउट परिपत्रक जारी करण्यात आले आणि विमानतळावर त्यांना अटक झाली. 

दुसऱ्या एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि के.व्ही. विश्वनाथ यांनी पतीच्या पालकांविरुद्धचा खटला रद्द केला. आपल्या मुलाला घटस्फोटासाठी संमती देण्यास भाग पाडण्यासाठी सुनेने हा गुन्हा नोंदवला होता. 

थेट घटस्फाेटच केला मंजूर

पतीची घटस्फोटाची याचिका भोपाळहून पुणे कोर्टात हस्तांतरित करण्यासाठी पत्नीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. याचा निकाल देताना सर्वाेच्च न्यायालयाने, वैवाहिक नाते पूर्णपणे तुटले आहे. ते पुढे चालू ठेवण्यास भाग पाडल्याने आणखी त्रासाचे होईल म्हणत थेट घटस्फोट मंजूर केला. पतीविरुद्धचे सर्व गुन्हेही न्यायालयाने रद्द केले.

सुप्रीम कोर्टाचे गंभीर निरीक्षण

वैवाहिक विवादांच्या बहुतेक तक्रारींत एकत्रित पॅकेजप्रमाणे आयपीसी ४९८ अ (जाच), ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक कृत्य) ५०६ (धमकी) च्या कलमांचा वापर ही प्रथा झाली आहे. महिला गंभीर गुन्ह्यांचा वापर वाटाघाटीसाठी याचा साधन म्हणून करतात. त्यांच्या बहुतेक मागण्या आर्थिक असतात. पत्नी किरकोळ मतभेद मोठे करून अहंकार आणि प्रतिष्ठेच्या विचित्र लढाईत घरातील वाद रस्त्यावर आणते. एफआयआरमधील "कलमांच्या गंभीरतेमुळे" प्रभावित ट्रायल कोर्ट आरोपींना जामीन देण्यास कचरतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्या. पंकज मिथल

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय