‘येथील महिला अधिक दारू पितात’, काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 08:06 IST2025-08-27T08:06:19+5:302025-08-27T08:06:32+5:30

Madhya Pradesh News: मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी राज्यातील महिला व 'लाडली बहना' या इतर राज्यांपेक्षा अधिक दारू आणि अमली पदार्थ वापरतात, असे विधान करून वाद ओढवून घेतला आहे.

'Women here drink more alcohol', Controversy over Congress leader's statement | ‘येथील महिला अधिक दारू पितात’, काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद

‘येथील महिला अधिक दारू पितात’, काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद

भोपाळ : मध्य प्रदेशकाँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी राज्यातील महिला व 'लाडली बहना' या इतर राज्यांपेक्षा अधिक दारू आणि अमली पदार्थ वापरतात, असे विधान करून वाद ओढवून घेतला आहे. भाजप नेते व मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याला महिलांचा अपमान ठरवत पटवारी यांना पदावरून काढण्याची आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.

यादव म्हणाले की, राज्यातील महिलांना व्यसनाशी जोडून त्यांचा अपमान करण्यात आला आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी पटवारी यांचे वक्तव्य हे  काँग्रेसच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. पटवारी यांनी सोमवारी मुख्यमंत्री व्यसनविरोधी उपाययोजनेत अपयशी ठरल्याचा आरोप करताना हे वक्तव्य केले होते.

 

Web Title: 'Women here drink more alcohol', Controversy over Congress leader's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.