धक्कादायक! सरकारी शाळेत क्वारंटाईन केलेल्या महिलेवर तीन तरुणांनी केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 03:18 PM2020-04-26T15:18:03+5:302020-04-26T17:01:19+5:30

एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

A woman who was quarantined in a government school in Rajasthan was raped by three youths mac | धक्कादायक! सरकारी शाळेत क्वारंटाईन केलेल्या महिलेवर तीन तरुणांनी केला बलात्कार

धक्कादायक! सरकारी शाळेत क्वारंटाईन केलेल्या महिलेवर तीन तरुणांनी केला बलात्कार

googlenewsNext

नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही मागच्या २४ तासांमध्ये १९९० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ हजारवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

राजस्थानमधील सवाई माधवपुर जिल्ह्यातील क्वारंटाईन केलेल्या ४० वर्षीय महिलेवर तीन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तिघांविरोधात शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

लॉकडाऊनमुळं पीडित महिला सवाई माधवपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून अडकली आहे. गावकऱ्यांनी तिच्या राहण्याची व्यवस्था सरकारी शाळेत केली होती. मात्र त्याच गावातील तीन तरुणांनी गुरुवारी रात्री महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तिनही आरोपींचे वय २० वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या अत्याचारात झाली वाढ

लॉकडाऊनमध्ये केवळ महिलाच नाहीत तर मुलेही घरातच बंद आहेत. ही त्याची मोठी समस्या बनली आहे कारण त्याला अजूनही छळ करणाऱ्यांसोबत २४ तास घालवावे लागत आहे. हेच कारण आहे की २० ते ३१ मार्च दरम्यान 'चाईल्डलाईन १०९८' ला देशभरातून ३ लाख ७ हजार कॉल आले. चाइल्डलाइन इंडियाचे उपसंचालक हर्लीन वालिया म्हणाले की, ९२,१०५ कॉलपैकी ३० टक्के कॉल मुलांना त्रास व हिंसाचारापासून वाचवण्यासाठी केले गेले. २४ मार्चपासून देशात लॉकडाउन लागू आहे. म्हणजेच लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ झाली आहे. वालिया यांच्या मते, लॉकडाऊननंतर अशा तक्रारींमध्ये ५०% वाढ झाली आहे.

महिलांवरील अत्याचारही वाढले

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, २४ मार्च ते १ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात महिलांवरील अत्याचार केल्याच्या १,२५७ तक्रारी आल्या. अशी भीती अशी आहे की, अशा बऱ्याच घडल्या असतील, परंतु छळ केल्यानंतर चोवीस तास घरीच असल्याने भीतीपोटी महिला तक्रार नोंदवू शकणार नाहीत.

आणखी वाचा...

युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला

CoronaVirus पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवट? कोरोनाआडून इम्रान खानची 'विकेट' काढणार

Video "चार बायका, २६ मुले, त्यांना खायला कुठून आणू?" पाकिस्तानीची व्यथा

किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही क्रूर आहे बहीण क‍िम यो जोंग

किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता

...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन

Web Title: A woman who was quarantined in a government school in Rajasthan was raped by three youths mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.