मोदींमुळे एकत्र आलेल्या 'त्या' दोघांनी केलं लग्न अन् आता बिनसलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 10:05 IST2019-02-05T10:05:13+5:302019-02-05T10:05:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते आहेत. तरुण पिढीतल्या अनेक युवकांमध्ये मोदी लोकप्रिय आहेत.

woman married man because he loves pm modi now accuses husband of torture | मोदींमुळे एकत्र आलेल्या 'त्या' दोघांनी केलं लग्न अन् आता बिनसलं

मोदींमुळे एकत्र आलेल्या 'त्या' दोघांनी केलं लग्न अन् आता बिनसलं

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते आहेत. तरुण पिढीतल्या अनेक युवकांमध्ये मोदी लोकप्रिय आहेत. असाच एक मुलगा आणि मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. विशेष म्हणजे मोदीसंदर्भातील विचार जुळत असल्यानं त्या दोघांनी लग्नसुद्धा केलं. परंतु लग्नाच्या महिन्याभरानंतर पती छळ करत असल्याचा आरोप त्या नवविवाहित तरुणीनं केला आहे. अल्पिका पांडेय नावाच्या एका मुलीनं ट्विटर पती जय दवे मारहाण करून छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

अल्पिका म्हणाली, या सर्व प्रकरणात मुलाचे पालक त्याला पाठिंबा देत आहेत. अल्पिकाचा वापर करून जय सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोपही अल्पिकानं केला आहे.

जयनं सांगितलं होतं की, राहुल गांधींच्या एका ट्विटवर मी कमेंट केली, ती कमेंट त्या मुलीला आवडली. त्यानंतर आमची ओळख झाली. आम्ही दोघे मोदी समर्थक आहोत. कारण आम्ही दोघेही देशासाठी जगू इच्छितो, म्हणूनच आम्ही एकत्र होण्याचा निर्णय घेतला.


मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरला त्या दोघांनी लग्न केलं. अल्पिका म्हणाली, माझ्या पतीनं मानसिक आणि शारीरिक पद्धतीनं एवढा त्रास दिला की, मी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. मी कोणाच्या सोबतीशिवाय घराबाहेरही पडू शकत नाही. जयनं माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. आता मुलगी स्वतःच्या पालकांसोबत राहते.

Web Title: woman married man because he loves pm modi now accuses husband of torture