प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 11:35 IST2018-01-18T11:29:11+5:302018-01-18T11:35:26+5:30

महेश  घरी आला तेव्हा त्याच्या गळयावर जखमा होत्या. घरी आल्यानंतर त्याने दारु प्यायला सुरुवात केली. रात्री 10.30च्या सुमारास जेव्हा मी जेवणासाठी म्हणून बोलवायला गेली तेव्हा महेश मृतावस्थेत आढळला.

Woman kills husband with lover’s help | प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने केली पतीची हत्या

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने केली पतीची हत्या

ठळक मुद्देआरोपी दिपाली 31 वर्षांची असून ती एका गारमेंट फॅक्टरीत नोकरीला आहे. शवविच्छेदन अहवालातून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. 

बंगळुरु - नव-याने नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणली. बंगळुरुच्या हुलीमाऊ भागात केम्पाम्मा लेआऊट येथे 8 जानेवारी रोजी हे हत्याकांड घडले. आरोपी दिपाली 31 वर्षांची असून ती एका गारमेंट फॅक्टरीत नोकरीला आहे. तिचा प्रियकर राजकुमार नायकही (25) त्याच फॅक्टरीत नोकरीला आहे. तुरुंगवारी टाळण्यासाठी दिपालीने पती महेश धर्मराजचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. 

तिने पोलिसांना सांगितले कि, महेश  घरी आला तेव्हा त्याच्या गळयावर जखमा होत्या. घरी आल्यानंतर त्याने दारु प्यायला सुरुवात केली. रात्री 10.30च्या सुमारास जेव्हा मी जेवणासाठी म्हणून बोलवायला गेली तेव्हा महेश मृतावस्थेत आढळला. पोलिसांसमोर महेश धर्मराजचा मृत्यू अचानक झाल्याचा भासवण्याचा तिने प्रयत्न केला. पण शवविच्छेदन अहवालातून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. 
पोलिसांना दिपालीवर संशय आल्यानंतर त्यांनी तिला चौकशीसाठी बोलावले. तिने सुरुवातीला गुन्हा कबूल करण्यासाठी नकार दिला पण पोलिसांनी तिची कसून चौकशी सुरु केल्यानंतर तिने प्रियकर राजकुमारच्या साथीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.

मागच्या सहा महिन्यांपासून दिपाली आणि राजकुमारमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. आठ जानेवारीला दिपालीच्या घरात तिचा आणि राजकुमारचा प्रणय सुरु असताना महेश धर्मराजने दोघांना पकडले. त्यावेळी दोघांनी मिळून महेश धर्मराजची गळा आवळून हत्या केली.

Web Title: Woman kills husband with lover’s help