महिलेची झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 18:47 IST2022-08-23T18:47:14+5:302022-08-23T18:47:51+5:30

महिलेने भररस्त्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Woman hits Zomato delivery boy with shoe; Demand for action after video goes viral | महिलेची झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

महिलेची झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी


एका महिलेकडून भररस्त्यात झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जात असताना महिलेने त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. क्लिपमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय शांतपणे उभा असलेला दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 16 ऑगस्टचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ dj नावाच्या ट्विटर युजरने पोस्ट केला असून, त्याने दावा केला की डिलिव्हरी पार्टनर त्याची ऑर्डर घेऊन जात होता, तेव्हा महिलेने त्याला मारहाण केली. यावेळी तिथे उभा असलेल्या एका व्यक्तीने घटना रेकॉर्ड केली. 


युजरने ही घटना नेमकी कुठली आहे, त्याचा उल्लेख केलेला नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक महिलेवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. एकाने लिहिले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी झोमॅटो कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न केला. महिला त्याच्याशी अशी का वागली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमके कारण कळू शकले नाही.

Web Title: Woman hits Zomato delivery boy with shoe; Demand for action after video goes viral