मेकअपमुळे वधूच्या चेहऱ्याची लागली वाट, थेट ICU मध्ये भरती; नवरदेवाने लग्नाला दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 15:24 IST2023-03-04T15:19:34+5:302023-03-04T15:24:19+5:30
लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणं हे प्रत्येक वधूचं स्वप्न असतं आणि यासाठी वधू उत्तम ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होते.

मेकअपमुळे वधूच्या चेहऱ्याची लागली वाट, थेट ICU मध्ये भरती; नवरदेवाने लग्नाला दिला नकार
कर्नाटकातील हसन जिल्ह्यात लग्न मोडल्याचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. महिला लग्नापूर्वी मेकअपसाठी गेली होती. यावेळी तिचा चेहरा काळवंडला. यानंतर तिची अवस्था पाहून नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला आहे. ही घटना जिल्ह्यातील अरासिकेरे येथील आहे. सध्या या महिलेवर म्हणजेच नववधूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेला काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा होता आणि फाउंडेशन लावल्यानंतर तिने वाफ घेतली. काही वेळातच तिचा चेहरा काळवंडला आणि सुजला. महिलेच्या नातेवाईकांनी गंगा या ब्युटी पार्लरच्या मालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस मालकाला बोलावून त्याची चौकशी करत आहेत.
लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणं हे प्रत्येक वधूचं स्वप्न असतं आणि यासाठी वधू उत्तम ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होते. मेकओव्हर अनेक दिवस अगोदर सुरू होतो, ज्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. पण हा मेकअप कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एका मुलीला महागात पडला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. इतकंच नाही तर चेहरा बिघडल्यावर वर आणि त्याच्या नातेवाईकांनी लग्नालाही नकार दिला.
सध्या मुलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मुलीच्या नातेवाईकांनी पार्लरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ब्युटी पार्लरमध्ये मेकओव्हर केल्यावर जिल्ह्यातील अरसीकेरे शहरातील जबां जजूर गावातील मुलीचा चेहरा काळा पडला आणि सुजल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीयांना रडू कोसळले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"