चहा प्यायला गेल्यावर सून बॉयफ्रेंडसोबत दिसली; सासूने दोघांचा पाठलाग केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:20 IST2020-07-17T13:10:59+5:302020-07-17T13:20:45+5:30

तक्रारदार महिला आणि तिची सून सरकारी रुग्णालयात काम करतात.

Woman catches daughter-in-law with boyfriend in Ahmedabad | चहा प्यायला गेल्यावर सून बॉयफ्रेंडसोबत दिसली; सासूने दोघांचा पाठलाग केला अन्...

चहा प्यायला गेल्यावर सून बॉयफ्रेंडसोबत दिसली; सासूने दोघांचा पाठलाग केला अन्...

गुजरातमधील अहमादाबाद शहरातील एका ५५ वर्षीय महिलेने आपली सून आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माझ्या सूनेला मी तिच्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. यानंतर सूनेच्या बॉयफ्रेंडने तिला शिवीगाळ केली, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची सून सरकारी रुग्णालयात काम करतात. अडीच वर्षांपूर्वी तिच्या मुलाचं आरोपी महिलेशी लग्न झालं होतं. पण दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू झाल्यामुळे सून आपल्या आईवडिलांसोबत राहते. मात्र तक्रारदार महिला रुग्णालयाबाहेर चहा प्यायला गेली होती. त्यावेळी तिने सूनेला एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिलं. त्यानंतर तक्रारदार महिलेने दोघांचा पाठलाग केला.

तक्रारदार महिलने सांगितले की, सून आणि तिच्यासोबत असणारी दूसरी व्यक्ती अर्सवा परिसरातील एका घरात गेले होते. मी घराबाहेर येण्याची दोघांची वाट पाहत होती. मात्र बराच वेळ दोघही घराबाहेर आले नाही. त्यानंतर मी दरवाजा ठोठावला. 

दरवाजा उघडण्यासाठी घरातील एक व्यक्ती बाहेर आली. त्यावेळी दरवाज उभी असताना सूनेनं मला पाहिलं आणि तिने तेथून पळ काढला. त्यानंतर सूनेसोबत असणाऱ्या व्यक्ती घराबाहेर आला आणि मला शिवीगाळ करु लागला. अखेर महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन सूनेसोबत असणारा व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. महिलेनं सून आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Woman catches daughter-in-law with boyfriend in Ahmedabad