शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
3
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
4
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
5
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
6
"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
7
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
8
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
9
मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण, मेटल शेअर्स वधारले
10
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
11
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
12
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
13
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
14
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
15
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
17
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
18
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
19
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
20
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 20:38 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बागपत येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे एका महिलेने तिच्या पतीच्या काळ्या कारनाम्यांचं गुपित पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या घरी धाव घेत घराची झडती घेतली. या झाडाझडतीवेळी जुना कुलर उघडून पाहिला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. या कुलरमध्ये गोळ्या आणि कट्टे सापडले.

उत्तर प्रदेशमधील बागपत येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे एका महिलेने तिच्या पतीच्या काळ्या कारनाम्यांचं गुपित पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या घरी धाव घेत घराची झडती घेतली. या झाडाझडतीवेळी जुना कुलर उघडून पाहिला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. या कुलरमध्ये गोळ्या आणि कट्टे सापडले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना बागपतमधील जवाहरपूर मेवला गावातील आहे. येथे एका महिलेने डायल ११२ वर फोन करून रडत रडत पोलिसांकडे मदत मागितली. माझा पती मला दररोज मारहाण करतो. तसेच बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी देतो. एवढंच नाती तर त्याने घरात शस्त्रास्त्रांचा साठा करून ठेवला आहे, अशी माहिती या महिलेने दिली.

याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या महिलेच्या पतीला ताब्यात घेत घराची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीदरम्यान, पोलिसांनी एका कोपऱ्यात ठेवलेला कूलर उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या कुलरमध्ये पोलिसांनी तीन देशी कट्टे आणि डझनभर काडतुसं सापडली.

त्यानंतरत पोलिसांनी या महिलेचा पती नवीन याला ताब्यात घेत सर्व हत्यारे जप्त केली. आरोपी नवीन याला पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले आहे. तिथे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये नवीन याने दिल्लीतील एका व्यक्तीकडून आपण ही हत्यारे खरेदी केल्याचे सांगितले. नवीन याचा हत्यारांचा पुरवठा करणाऱ्या कुठल्या टोळीशी संबंध नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Woman's tearful call exposes husband's secrets; weapons found in cooler.

Web Summary : In Baghpat, a woman reported her husband's abuse and illegal weapons. Police found hidden guns and cartridges inside a cooler during a search. The husband, named Naveen, was arrested; investigation underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस