वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 20:01 IST2025-10-11T20:00:36+5:302025-10-11T20:01:10+5:30
Uttar Pradesh Crime News: आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाला घरी बोलावून त्याच्यासोबत वारंवार संबंध ठेवणाऱ्या आणि त्याने टाळायला सुरुवात केल्यावर सुपारी देऊन त्याची हत्या करणाऱ्या अन्नपूर्ण भारती उर्फ पूजा शकून पांडेय या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाला घरी बोलावून त्याच्यासोबत वारंवार संबंध ठेवणाऱ्या आणि त्याने टाळायला सुरुवात केल्यावर सुपारी देऊन त्याची हत्या करणाऱ्या अन्नपूर्ण भारती उर्फ पूजा शकून पांडेय या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अन्नपूर्णा भारती उर्फ पूजा शकून पांडेय ही माजी महामंडलेश्वर आहे. तसेच ती धर्म, कर्म, उपासना याबाबत प्रवचने द्यायची, मात्र आता ती एकतर्फी प्रेम वासना, आणि खुनाच्या प्रकरणात मुख्य आरोपी बनली आहे.
अभिषेक गुप्ता असं मृत तरुणाचं नाव असून, तो आरोपी पूजा शकून पांडेय हिच्यापेक्षा खूप लहान होता. अभ्यासाच्या बहाण्याने त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. तसेच पुढे पूजा शकून पांडे हिचे त्याच्यासोबत अनैतिक संबध प्रस्थापित झाले. ती अभिषेक याला घरी बोलावून त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवायची. मात्र काही काळाने या संबंधांना कंटाळलेल्या अभिषेक याने तिला टाळण्यास सुरुवात केली. तसेच तिचा नंबर बंद करून तिला सोशल मीडियावरूनही ब्लॉक केलं.
मात्र अभिषेकने टाळण्यास सुरुवात केल्याने पूजा ही संतापली. तिने पती अशोक पांडेय याच्यासोबत मिळून अभिषेक याचा काटा काढण्याचा कट रचला. पूजा आणि तिचा पती अशोक पांडेय यांनी अभिषेक गुप्ता याची हत्या करण्यासाठी एका शूटरला सुपारी दिली. तसेच त्याची हत्या केली. या हत्येनंतर पोलिसांनी अशोक पांडेय आणि एका शूटरला अटक केली. मात्र पूजा शकून पांडेय ही फरार झाली होती. तसेच हरिद्वार येथे साध्वीचा वेश घेऊन लपली होती.
अखेर अलिगड पोलिसांना सातत्याने पाठलाग करून तिला शोधून काढले आणि हरिद्वार येथून तिला पकडले. पूजा शकूर पांडेय हिला अटक केल्याने हे हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.