शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप, पीडिता म्हणाली, तो आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 11:50 IST

उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. राज्यातील बदायूं जिल्ह्यातील बिसौली मतदारसंघातील भाजपा आमदार  कुशाग्र सागर याच्यावर एका स्थानिक तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पीडित तरुणीने दिला आहे.  हे प्रकरण सर्वांसमोर आल्यापासून मला धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र मला न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करेन, असे पीडित तरुणीने म्हटले आहे.  कुशाग्र सागर हा आमदार म्हणून निवडून आल्यापासून आपले आयुष्य बरबाद झाल्याचा आरोप तिने केला आहे.  ती म्हणते, माझे कुटुंब गरीब आहे. माझे वडील बेरोजगार असताना आई ग्रीन पार्क परिसरातील काही घरांमध्ये घरकामासाठी जात असे. तसेच मदतीसाठी मला नेत असे. 2016 साली मी केवळ 16 वर्षांची असताना मी सागरच्या घरी घरकाम करण्यासाठी जात असे. तेव्हाच माझी आणि त्याची ओळख झाली. सागर माझ्याशी बोलू लागला. तसेच त्याने माझ्याशी विवाह करण्याचेही वचन दिले. तसेच माझ्या असहायतेचा गैरफायदा घेऊन 2012 पासून 2014 पर्यंत अनेक वेळा माझ्यावर बलात्कार केला. दरम्यान, कुशाग्र सागर याचा अन्य तरुणीशी विवाह निश्चित झाला असून, 17 जून रोजी त्याचा विवाह संपन्न होणार आहे.

 मात्र या आरोपांचे भाजपा आमदार कुशाग्र सागर यांनी खंडन केले आहे. "हे सगळे आरोप पूर्णपणे खोटे आहे, हे स्पष्ट आहे. माझी आणि पक्षाची प्रतिमा बिघडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मला 25 वर्षे होत आहेत आणि ही तरुणी मी 20 वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत आहे, असे सांगत आहे. असे असेल तर कुणीही कुणावरही बलात्काराचा आरोप करू शकतो. मी आमदार आहे म्हणून या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.  मी या प्रकरणाच्या चौकशीकी मागणी करतो. तसेच यात जो दोषी आढळेल त्याला शिक्षा व्हावी. जर मी दोषी असेन तर मला शिक्षा द्या आणि जर ही तरुणी दोषी असेल तर तिला शिक्षा व्हावी." असे आमदार कुशाग्र सागर यांनी म्हटले आहे. "तसेच 2014 साली सुद्धा सदर  तरुणीने माझ्यावर आरोप करण्याचा  प्रयत्न केला होता. मात्र सीओनीं केलेल्या चौकशीमध्ये हे आरोप बिनबुडाचे निघाले होते," असेही कुशाग्र सागर यांनी सांगितले.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाBJPभाजपाMLAआमदारUttar Pradeshउत्तर प्रदेश