वायरमनने घेतला बदला...पोलीस ठाण्याची चक्क वीजच तोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 04:04 PM2019-08-01T16:04:41+5:302019-08-01T16:16:08+5:30

वायरमनने पोलिसांना त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याला दंड भरायला लावला.

wireman took revenge; he cut police station's power supply | वायरमनने घेतला बदला...पोलीस ठाण्याची चक्क वीजच तोडली

वायरमनने घेतला बदला...पोलीस ठाण्याची चक्क वीजच तोडली

Next

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चलन फाडल्यास बऱ्याचदा विनवणी, हुज्जत घातली जाते. काही वेळा या पोलिसांना मारहाणही केली जाते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये तर वेगळाच किस्सा घडला आहे. तेथील वीज वितरण कंपनीच्या वायरमनने पोलिस ठाण्याचीच वीज कापत बदला घेतला आहे. यामागचे कारणही तसेच आहे. 


घडले असे की, या वायरमनला वीज वितरण कंपनीने फिरोजाबाद जिल्ह्यातील आग्रा शहराच्या शेजारचा विभाग दिला आहे. या ठिकाणी एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी हा वायरमन गेला होता. मोटारसायकलवरून माघारी परतताना त्याला पोलिसांनी विना हॅल्मेट पकडले आणि 500 रुपयांची पावती फाडली. 


या वायरमनने पोलिसांना त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याला दंड भरायला लावला. याचा बदला घेण्याच्या भावनेतून या वायरमनने चक्क त्या पोलिस ठाण्याची वीजच कापली. उप निरीक्षक रमेश चंद्रा यांनी त्याला दंड आकारला होता. 
या वायरमनने चंद्रा यांना त्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावून दिला. त्यांनी वायरमनला माफ करण्यास सांगितले, मात्र वाहतूक पोलिसांनी त्यांना माफ केली नाही. आता वायरमन आणि त्याच्या अधिकाऱ्याने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरविले. या वायरमनने या पोलिस ठाण्याची वीजच खंडीत केली. या पोलिस ठाण्याकडून वीज वितरण कंपनीचे 6.62 लाख रुपये थकलेले आहेत. हे कारण देत वीज वितरण कंपनीने या पोलिस ठाण्याची वीजच बंद केली आहे. 


या प्रकारावरून कंपनीचा अधिकाऱी DVVNL चे रणवीर सिंह यांनी वायरमनची बाजू घेत पोलिस ठाण्याला बिल भरण्यासाठी अनेकदा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. 2016 पासून त्यांनी एकही रुपया भरलेला नाही. अशा थकबाकीदारांमुळे कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगारही मिळालेला नाही. यामुळे वायरमन 500 रुपयांचे चलनही भरू शकत नाही. यामुळे कर्मचारीही संतापले आहेत. पोलिसांनीच बिल थकविल्याने त्यांची वीज कापली आहे. 


तर दुसरीकडे पोलिसांनी दावा केला आहे की, वायरमन श्रीनिवास यांना कारवाईसाठी बोलविण्यात आले होते. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे 1.15 कोटी रुपयांचे बिल भरलेले आहे. उर्वरित बिलही लवकरच भरण्यात येईल.

Web Title: wireman took revenge; he cut police station's power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.