lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Stock: शेअर असावा तर असा, १५ दिवसांत दुप्पट झाले पैसे; वर्षभरात १० पट मिळाला रिटर्न 

Multibagger Stock: शेअर असावा तर असा, १५ दिवसांत दुप्पट झाले पैसे; वर्षभरात १० पट मिळाला रिटर्न 

काही स्टॉक तुमचे कष्टाचे पैसे बुडवू शकतात तर काही तुमचे पैसे काही दिवसात दुप्पटही करू शकतात. आज आपण अशा शेअरच्या कामगिरीबद्दल बोलणार आहोत ज्यानं केवळ 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:32 PM2024-04-25T13:32:36+5:302024-04-25T13:34:08+5:30

काही स्टॉक तुमचे कष्टाचे पैसे बुडवू शकतात तर काही तुमचे पैसे काही दिवसात दुप्पटही करू शकतात. आज आपण अशा शेअरच्या कामगिरीबद्दल बोलणार आहोत ज्यानं केवळ 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.

Multibagger Stock indo tech transformers money doubles in 15 days Got 10 times return in a year investment | Multibagger Stock: शेअर असावा तर असा, १५ दिवसांत दुप्पट झाले पैसे; वर्षभरात १० पट मिळाला रिटर्न 

Multibagger Stock: शेअर असावा तर असा, १५ दिवसांत दुप्पट झाले पैसे; वर्षभरात १० पट मिळाला रिटर्न 

Multibagger Stock: ज्यात रिस्क आहे, त्यात मिळणारा परतावाही अधिक असू शकतो. काही स्टॉक तुमचे कष्टाचे पैसे बुडवू शकतात तर काही तुमचे पैसे काही दिवसात दुप्पटही करू शकतात. आज आपण अशा शेअरच्या कामगिरीबद्दल बोलणार आहोत ज्यानं केवळ 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड असं या शेअरचं नाव आहे.
 

ज्यानं 15 दिवसांपूर्वी इंडो टेक शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील त्यांना दुप्पट परतावा मिळाला असेल. या शेअरनं अवघ्या 15 दिवसांत 99.55 टक्क्यांनी झेप घेतली आहे. याने अवघ्या 5 दिवसांत 25 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी ज्यांनी यामध्ये पैसे गुंतवले त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. त्यांची 1 लाख रुपयांची गुंतवणूक 306.50 टक्क्यांनी वाढून 4.06 लाखांवर पोहोचली आहे.
 

वर्षभरात 10 पट रिटर्न
 

या वर्षी शेअरनं आतापर्यंत 184 टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 10 पट परतावा दिला आहे. इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2005.95 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 190.10 रुपये आहे. कंपनीनं बुधवारी 24 एप्रिल रोजी उच्चांकी स्तर गाठला होता.
 

काय करते कंपनी?
 

इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड ही पॉवर सेक्टरमधील एक स्मॉल कॅप कंपनी आहे. कंपनीचं मार्केट कॅप 2105.47 कोटी रुपये आहे. कंपनीच्या प्रमुख प्रोडक्ट/रेव्हेन्यू सेगमेंटमध्ये ट्रान्सफॉर्मर, सेल अँड सर्व्हिसेस आणि स्क्रॅपचा समावेश आहे. 
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

 

 

Web Title: Multibagger Stock indo tech transformers money doubles in 15 days Got 10 times return in a year investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.