Winter session of Parliament from today | संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून; विविध विषयांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून; विविध विषयांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

नवी दिल्ली : सोमवारपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. जम्मू, काश्मीरमधील स्थिती, आर्थिक मंदी, बेकारी, प्रस्तावित नागरिकत्व विधेयक आदी विषयांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला अधिक अधिकार यासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत झाली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे विधेयकही संमत केले होते. नागरिकत्व विधेयक संमत करून घेण्याबरोबरच दोन वटहुकुमांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकार या वेळी प्रयत्नशील असेल. नव्या व देशी उत्पादक कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात कपात करणे तसेच ई-सिगारेट व सदृश उत्पादनांच्या विक्री, उत्पादन व साठवणुकीवर बंदी घालणे असे दोन वटहुकूम सप्टेंबर महिन्यात जारी करण्यात आले होते.

Web Title: Winter session of Parliament from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.