शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

 विंग कमांडर अभिनंदन यांचा आयएसआयने 40 तास केला होता छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 09:52 IST

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र....

नवी दिल्ली - एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन हे सुरुवातीला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांनी आयएसआय या कुख्यात गुप्तहेर संघटनेकडे सोपवण्यात आले होते. 

संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांचे विमानही दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेऊन सुमारे चार तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना आयएसआयच्या ताब्यात देण्यात आले. आयएसआयचे अधिकारी त्यांना इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे घेऊन गेले. तिथे अभिनंदन यांना  सुमारे 40 तास स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अनन्वित छळ करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला. अभिनंदन यांना इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे नेताना डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. त्यामुळे त्यांना काहीही दिसत नव्हते. तसेच आयएसआयने त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांना मारहाण केली. त्यामुळे अभिनंदन यांच्या उजव्या डोळ्याभोवती काळ्या डागाचे निशाण तयार झाले आहे.   एकीकडे एवढी मारहाण होत असताना अभिनंदन यांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. मात्र भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासंदर्भातील सर्व माहिती सांगून टाकली. दरम्यान, इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत अभिनंदन यांना मुक्त करण्याची घोषणा केली. मात्र आयएसआय अभिनंदन यांची सुटका करण्यास तयार नव्हती. 

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी दुसऱ्या दिवशी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हा हल्ला भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. मात्र या चकमकीदरम्यान अभिनंदन यांचे मिग विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामुळे अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले होते. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक