राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 23:17 IST2026-04-04T22:57:21+5:302026-04-04T23:17:40+5:30

सौरभ भारद्वाज यांच्या दाव्यानंतर, राघव चड्ढा यांच्या भविष्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चड्ढा येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशा चर्चा सुरू आहेत.

Will Raghav Chadha join BJP? Posts against PM Modi deleted; Saurabh Bhardwaj's big claim | राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा

राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा

मागील काही दिवसांपासून 'आप'चे खासदार राघव चड्ढा भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते सौरभ भारद्वाज यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चा पुन्हा वाढल्या आहेत.  सौरभ भारद्वाज यांनी दावा केला आहे की, राघव चड्ढा यांनी त्यांच्या पूर्वीच्या हँडलवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या सर्व पोस्ट हटवल्या आहेत. आता त्यांच्या प्रोफाइलवर मोदींशी संबंधित फक्त दोन पोस्ट आहेत, त्यापैकी एकामध्ये मोदींची प्रशंसा केली आहे. यामुळे राघव चड्ढा लवकरच 'आप' सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा

आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये दावा केला आहे की, राघव चड्ढा यांनी 'एक्स' च्या खात्यावरील पंतप्रधान मोदी किंवा भाजपवर टीका करणाऱ्या त्यांच्या सर्व जुन्या पोस्ट हटवल्या आहेत. एक्स' वरील काही लोकांच्या सूचनेनंतर त्यांनी राघव चड्ढा यांच्या टाइमलाइनवर 'भाजप' किंवा 'मोदी' हे शब्द शोधले, असे लिहिले आहे.

मोदींवर टीका करणारी एकही पोस्ट नाही

राघव चड्ढा यांच्या टाइमलाइनवर भाजप किंवा मोदींवर टीका करणारी एकही पोस्ट नाही, असा दावा सौरभ भारद्वाज यांनी केला.  याचा अर्थ राघव चड्ढा यांनी त्यांच्या सर्व जुन्या पोस्ट्स डिलीट केल्या आहेत. राघव यांच्या टाइमलाइनवर 'मोदी' हा शब्द असलेल्या फक्त दोनच पोस्ट्स आहेत. या दोन्ही पोस्ट्समध्ये राघव चड्ढा यांनी मोदींची प्रशंसा केली आहे.

Web Title : राघव चड्ढा क्या भाजपा में जाएंगे? मोदी विरोधी पोस्ट डिलीट होने से अटकलें

Web Summary : आप नेता राघव चड्ढा के भाजपा में शामिल होने की अटकलें तेज। पीएम मोदी की आलोचना वाली पोस्ट कथित तौर पर डिलीट कीं। सौरभ भारद्वाज ने कहा, केवल मोदी समर्थक पोस्ट ही बची हैं। जल्द पार्टी बदलने की अटकलें।

Web Title : Raghav Chadha to join BJP? Deleted posts against Modi spark rumors.

Web Summary : AAP leader Raghav Chadha faces BJP entry rumors. He allegedly deleted posts criticizing PM Modi. Saurabh Bharadwaj highlighted this, noting only pro-Modi posts remain. Speculation suggests Chadha might switch parties soon.