शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही स्थितीत पद्मावत प्रदर्शित होऊ देणार नाही -  लोकेंद्र कालवी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 14:45 IST

संजय लीला भन्साळी  दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. ' पद्मावत' सिनेमाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून कोणत्याही स्थितीत 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा शब्दांत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र कालवी यांनी इशारा दिला आहे. 

जयपूर : संजय लीला भन्साळी  दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. ' पद्मावत' सिनेमाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून कोणत्याही स्थितीत 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा शब्दांत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र कालवी यांनी इशारा दिला आहे. 

याप्रकरणी दोषी कोणी नसून फक्त सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दोषी आहेत. 'पद्मावत' सिनेमावर जनतेने कर्फ्यू लावावा. मी याआधी सुद्धा सांगितले होते, तेच आता पण सांगत आहे. 'पद्मावत' सिनेमा हा प्रदर्शित होऊ नये, असे लोकेंद्र कालवी म्हणाले. याचबरोबर, कोणत्याही स्थितीत 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही आणि ज्या राज्यात या सिनेमावर बंदी नाही. त्याठिकाणी जाऊन आमचे कार्यकर्ते हा सिनेमा बंद करतील, असे लोकेंद्र कालवी यांनी सांगितले. 

 

मुंबईत सिनेमाला विरोध करणारे करणी सेनेचे 17 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात'पद्मावत' सिनेमाला विरोध करणा-या करणी सेनेच्या मुंबईतील 17 कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

'पद्मावत'ला विरोधासाठी पुण्यात वाहनांची तोडफोड, दगडफेक करून फोडल्या गाड्यापुण्यामध्येही पद्मावत सिनेमाला विरोध करण्यात आला. सिनेमाला विरोध करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या जमावाने पुणे शहरातून जाणाऱ्या सातारा - मुंबई महामार्गावरील वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत किमान 10 वाहनाचं नुकसान झालं आहे. ही घटना महामार्गावरील वडगाव पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली. 

अहमदाबादमध्ये हिंसक आंदोलन, मॉलमध्ये तोडफोड 'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाने हिंसक रुप घेतलं आहे. अहमदबादमधील अल्फा आणि हिमालया मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचा प्रकार समोर आला आहे.  पद्मावत चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असला तरी या चित्रपटाला सुरु असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. या चित्रपटाला विरोध करणार्यांनी आज अहमदाबादमधील काही मॉल्समध्ये जाऊन तोडफोड केली व तीन मॉलमध्ये आग लावण्याचेही प्रकार घडले. अहमदाबादमधील हिमालयन मॉलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही नासधूस करण्यात आली. मेमनगर भागातील एका मॉलमध्येही जमावाने तोडफोड केली. 

टॅग्स :Padmavatपद्मावतKarni Senaकरणी सेनाPadmavatiपद्मावती