... तर पद्मावती सिनेमा दाखविणारे थिएटर्स जाळून टाकू, भाजपा आमदाराचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 12:57 PM2017-11-07T12:57:23+5:302017-11-07T12:58:37+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमा समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.

will burn theatres screening padmavati- BJP MLA | ... तर पद्मावती सिनेमा दाखविणारे थिएटर्स जाळून टाकू, भाजपा आमदाराचं वक्तव्य

... तर पद्मावती सिनेमा दाखविणारे थिएटर्स जाळून टाकू, भाजपा आमदाराचं वक्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमा समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. हैदराबादच्या एका भाजपा आमदाराने पद्मावती सिनेमाला विरोध करत थिएटर्सच्या स्क्रीन जाळण्याचं वक्तव्य केलं आहे.

हैदराबाद- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमा समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सिनेमा प्रदर्शित व्हायला काहीच दिवस बाकी असताना रोज नवी संकट सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गात येत आहेत. हैदराबादच्या एका भाजपा आमदाराने पद्मावती सिनेमाला विरोध करत थिएटर्सच्या स्क्रीन जाळण्याचं वक्तव्य केलं आहे. राजपूत समुदायाच्या मंजुरीशिवाय राज्यात सिनेमा प्रदर्शित केला, तर थिएटर्सच्या स्क्रीन जाळू, असं वक्तव्य भाजपा आमदार राजा सिंह यांनी केलं आहे. 

रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या राजपूत समुदायाच्या मेळाव्यात ते बोलत होते. राजा सिंह गोशामहलचे आमदार असून त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे प्रसिद्ध आहेत. हिंदू संस्कृतीची प्रतिमा कोणी मलिन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धडा शिकवू, असंही राजा सिंह यांनी म्हंटलं आहे. देशभरात पद्मावती सिनेमावर निषेध नोंदविला जातो आहे. पण इथे कुणीही सिनेमाबद्दल बोलत नाहीत. आपलं रक्त थंड झालं आहे, असं वक्तव्य राजा सिंह यांनी मेळाव्यात करून राजपूत समुदायांच्या लोकांना भडकाविण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं आहे. 

पद्मावती सिनेमातून राणी पद्मावती यांची चुकीची प्रतिमा प्रतिमा असल्यास थिएटरची स्क्रीन जाळली तर त्या व्यक्तीला जामीन मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल, असंही ते म्हणाले.  सिनेमा प्रदर्शनापूर्वी तो राजपूत समुदायाला दाखवावा, त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही प्रदर्शनाता कुठलाही अडथळा निर्माण करणार नसल्याचं राजा सिंह यांनी म्हंटलं


 

Web Title: will burn theatres screening padmavati- BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.