जागावाटपावरून नाराज असलेले अण्णामलाई निवडणूक लढवणार नाहीत? पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्राने तामिळनाडूमध्ये भाजपला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:08 IST2026-03-27T18:39:45+5:302026-03-27T19:08:19+5:30
विधानसभा निवडणुकीआधी तामिळनाडू भाजपमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. एआयएडीएमकेसोबतच्या जागावाटपाच्या व्यवस्थेवर असमाधानी असलेले राज्यातील भाजपचे प्रमुख नेते के. अण्णामलाई विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊ शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जागावाटपावरून नाराज असलेले अण्णामलाई निवडणूक लढवणार नाहीत? पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्राने तामिळनाडूमध्ये भाजपला मोठा धक्का
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे, भाजपानेही तयारी सुरू केली असून उमेदवार यादी जाहीर करण्याआधीच भाजपामध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. भाजपचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यातील जागावाटपाच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला पत्र लिहिले आहे.
मोठा निर्णय! राज्यात १ जानेवारी २०११ पर्यंतची सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमित होणार
अण्णामलाई यांनी काही जागा एआयडीएमकेला दिल्यावरून उघड नाराजी व्यक्त केली आहे. यबाबत अण्णामलाई यांनी दिल्लीतील पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. किनाथुकडावू जागेसह, भाजपला जिंकणे सोपे मानल्या जाणाऱ्या जागा एआयएडीएमकेने भाजपला न दिल्यामुळे ते नाराज आहेत. अण्णामलाई यांनी पक्षाच्या नेतृत्वाला कळवले आहे की ते तामिळनाडूची निवडणूक लढवणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
हा असंतोष पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही पसरला आहे. जागावाटपाच्या व्यवस्थेवरून आपला संताप व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी किनाथुकडावू येथे आंदोलन केले. एआयएडीएमकेसोबतच्या आघाडीतील जागावाटपाच्या व्यवस्थेवरून भाजपमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती याआधीही समोर आली होती.
एनडीएने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा करार निश्चित केला आहे. २३४ जागांपैकी एआयएडीएमके १६९ आणि भाजप २७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मित्रपक्षांनाही जागांचे वाटप करण्यात आले असून, पीएमकेला १८ आणि एएमएमकेला ११ जागा मिळाल्या आहेत.
जागावाटपार एआयडीएमकेचे नेते पलानीस्वामी यांनी सांगितले की, आघाडीतील चर्चा पार पडल्या असून जागावाटपाची चर्चाही झाल्या आहेत. तर पक्षांसोबत चर्चा अजूनही सुरू असून त्यांच्या जागावाटपाची घोषणा लवकरच केली जाईल.
तमिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.