कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्यांची दुसरी ग्लॅमरस पत्नी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 19:52 IST2018-05-20T19:52:33+5:302018-05-20T19:52:33+5:30

कुमारस्वामी यांच्या राजकीय कारकीर्दीबरोबरच त्यांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीविषयीची चर्चा सध्या रंगली आहे. 

Wife of upcoming Chief Minister of Karnataka | कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्यांची दुसरी ग्लॅमरस पत्नी 

कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्यांची दुसरी ग्लॅमरस पत्नी 

बंगळुरू - येडियुरप्पा सरकार अवघ्या अडीच दिवसांत पडल्यानंतर आता कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून एच.डी. कुमारस्वामी यांचे नाव निश्चित झाले आहे. त्याबरोबरच कुमारस्वामी हे आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कुमारस्वामी यांच्या राजकीय कारकीर्दीबरोबरच त्यांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीविषयीची चर्चा सध्या रंगली आहे. 
कुमारस्वामींची दुसरी पत्नी राधिका कुमारस्वामीचे नाव सध्या गुगलवर ट्रेंड करत आहे. नेटिझन्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्च करत आहेत. राधिका यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्च करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे राधिका ही कन्नडमधील प्रख्यात अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे. ती आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. राधिका ही 31 वर्षांची असून,  58 वर्षांच्या कुमारस्वामी यांच्यापेक्षा ती तब्बल 27 वर्षांनी लहान आहे.


राधिका हिचा कुमारस्वामी यांच्याशी विवाह होण्यापूर्वी रतन कुमार याच्याशी लग्न झाले होते. मात्र त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नव्हते. पुढे 2010 साली राधिका हिने आपण कुमारस्वामी यांच्याशी 2006 साली विवाह केल्याचा गौप्यस्फोट 2010 साली केला होता. कुमारस्वामी आणि राधिका यांना एक मुलगी असून, तिचे नाव शमिका आहे. तर राधिका यांच्याआधी कुमारस्वामींचा विवाह 1986 साली अनिता यांच्याशी झाला होता. या दोघांना एक मुलगा असून, त्याचे नाव निखिल गौडा आहे.  

Web Title: Wife of upcoming Chief Minister of Karnataka