पत्नीचा दिल्ली सोडण्यास नकार; पतीने चारित्र्याच्या संशयातून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 10:54 IST2018-10-07T10:51:17+5:302018-10-07T10:54:41+5:30

महत्वाचे म्हणजे दोघांनी 2013 मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघेही आझमगडचे राहणारे होते.

Wife refuses to leave Delhi; Murdered by husband | पत्नीचा दिल्ली सोडण्यास नकार; पतीने चारित्र्याच्या संशयातून केली हत्या

पत्नीचा दिल्ली सोडण्यास नकार; पतीने चारित्र्याच्या संशयातून केली हत्या

नवी दिल्ली : आजच्या जमान्यात पती-पत्नींमधील वाद सर्वश्रुतच आहेत. मात्र, पत्नीने शहर सोडण्यास नकार दिल्याने रागाऊन पतीने तिची थेट हत्या केल्याचा प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. ती दिल्ली सोडायला तयार नसल्याने पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. 


महत्वाचे म्हणजे दोघांनी 2013 मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघेही आझमगडचे राहणारे होते. मात्र, लग्नानंतर ते दिल्लीतील नजफगड भागात राहत होते. महीला त्यावेळी अल्पवयीन होती. यामुळे पतीविरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुव्हाही दाखल करण्यात आला होता. नंतर 2017 मध्ये न्यायालयाने मुलीच्या सांगण्यावरून खटला रद्द केला होता.

 
2 ऑक्टोबरला पोलिसांना या महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली. मात्र तिचा पती आफताब अहमद फरार झाला होता. आदल्या रात्री दोघेही एकत्रच होते. त्यांचा 4 वर्षांचा मुलगा आझमगड येथे राहतो. अफताबच्या मोबाईलची लोकेशन कधी सहारनपूर तर कधी लखनऊ येत होती. यानुसार पोलिसांनी त्याला काकीच्या घरातून अटक केली.


त्याने दिलेल्या माहितीनुसार पत्नीसोबत दिल्ली सोडून आझमगडला राहण्यास जाण्यासाठी बऱ्याचदा भांडणे होत होती. त्याला आझमगढला राहायचे होते. मात्र, पत्नीचा त्याला विरोध होता. यामुळे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. 2 ऑक्टोबरलाही याच गेष्टीवरून भांडण झाले. यावेळी आफताबने घरातील चाकूने तिचा गळा कापला. तसेच तिचा गळा ओढनीने दाबून फरार झाला. 
 

Web Title: Wife refuses to leave Delhi; Murdered by husband