धक्कादायक! पत्नी शारीरिक संबंधासाठी रोज ५००० रुपयांची मागणी करते, गुप्तांगांवरही हल्ला; इंजिनिअर पोलीस ठाण्यात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:24 IST2025-03-20T15:08:18+5:302025-03-20T15:24:36+5:30

पतीने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Wife demands Rs 5000 daily for sex, also attacks private parts Engineer reaches police station | धक्कादायक! पत्नी शारीरिक संबंधासाठी रोज ५००० रुपयांची मागणी करते, गुप्तांगांवरही हल्ला; इंजिनिअर पोलीस ठाण्यात पोहोचला

धक्कादायक! पत्नी शारीरिक संबंधासाठी रोज ५००० रुपयांची मागणी करते, गुप्तांगांवरही हल्ला; इंजिनिअर पोलीस ठाण्यात पोहोचला

बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका आयटी इंजिनिअरने त्याच्या पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या तरुणाने त्याच्या सासरच्या लोकांवर मानसिक आणि शारीरिक छळाचे खळबळजनक आरोप केले आहेत. लग्नाच्या तीन वर्षांनंतरही त्याची पत्नी त्याच्यासोबत व्यवस्थित राहत नाही आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दररोज ५,००० रुपये मागते, असा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

Disha Salian Case: 'तीन वर्षे आमचेच सरकार, तपासात काही सापडले नाही'; एकनाथ शिंदेंचे आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलले

तक्रारीत सॉफ्टवेअर इंजिनिअरने म्हटले आहे की, त्याचे लग्न १४ ऑगस्ट २०२२ रोजी झाले होते. लग्नाआधीच पत्नी आणि तिच्या आईने पैशांची मागणी करायला सुरुवात केली. लग्नाआधी पत्नीच्या आईने खात्यात ३ लाख रुपये ट्रान्सफर केले आणि लग्नाच्या खर्चासाठी ५०,००० रुपये रोखही घेतले. लग्नानंतरही मागण्या आणि छळ सुरूच राहिला.

पत्नीने लग्नापासून वैवाहिक जीवन जगले नाही. जेव्हा जेव्हा तो शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा पत्नी त्याला आत्महत्या करण्याची धमकी द्यायची आणि मृत्यूची चिठ्ठी लिहून ब्लॅकमेल करायची. पत्नीने त्याच्या गुप्तांगांवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही पतीने केला आहे.

पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि तिच्या कुटुंबाने घर खरेदी करण्यासाठी ६० लाख रुपयांची मागणी केली आणि दरमहा ७५,००० रुपयांचा ईएमआय भरण्यासाठी दबाव आणला. त्याने नकार दिल्यावर पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आणि सांगितले की तिच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ती संबंध ठेवणार नाही. यावेळी दोघांच्यात वाद झाले तेव्हा पती घटस्फोटाबद्दल बोलला तेव्हा पत्नीने तडजोड म्हणून ४५ लाख रुपयांची मागणी केली.

प्रोफेशनल जीवनावर परिणाम

घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आणखी एका आयटी इंजिनिअरने अशीच एक तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की, पत्नीकडून होणाऱ्या छळामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. घरून काम करत असताना, त्याची पत्नी त्याच्या ऑनलाइन मिटिंगमध्ये व्यत्यय आणायची, वाद घालायची आणि गाणी आणि नाच करून गोंधळ निर्माण करायची. पतीने आपल्या पत्नीच्या या कृती त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केल्या. त्या पुढे त्याने पुरावे म्हणून दिले आहेत.

Web Title: Wife demands Rs 5000 daily for sex, also attacks private parts Engineer reaches police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.