परस्त्रीबरोबर संबंध असल्याच्या संशयातून बायकोने कापले नवऱ्याचे गुप्तांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 12:11 IST2018-02-21T10:58:47+5:302018-02-21T12:11:45+5:30

लग्न, संसार मोडण्याला अनेकदा संशय कारणीभूत ठरतो. याच संशयातून काहीवेळा हत्याही होतात. एका महिलेने याच संशयापोटी आपल्या नव-याचे गुप्तांग कापून टाकले.

wife cut off her husband's genitalia | परस्त्रीबरोबर संबंध असल्याच्या संशयातून बायकोने कापले नवऱ्याचे गुप्तांग

परस्त्रीबरोबर संबंध असल्याच्या संशयातून बायकोने कापले नवऱ्याचे गुप्तांग

ठळक मुद्देमहिलेच्या हल्ल्यात आझाद सिंह गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मंगळवारी रात्री आझाद सिंह गाढ झोपेत असताना सुखवंत कौरने त्याच्यावर हल्ला केला.

जालंधर - लग्न, संसार मोडण्याला अनेकदा संशय कारणीभूत ठरतो. याच संशयातून काहीवेळा हत्याही होतात. पंजाबच्या जालंधर शहरात  राहणा-या एका महिलेने याच संशयापोटी आपल्या नव-याचे गुप्तांग कापून टाकले. नवऱ्याचे दुसऱ्या स्त्रीबरोबर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा या महिलेच्या मनात संशय होता. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.  गुप्तांग कापून तिने ते शौचालयात फेकून दिले. या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

महिलेच्या हल्ल्यात आझाद सिंह गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हे जोडपे जालंधरच्या जोगिंदर नगमध्ये राहते. मंगळवारी रात्री आझाद सिंह गाढ झोपेत असताना सुखवंत कौरने त्याच्यावर हल्ला केला अशी माहिती जालंधरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतिंदर कुमार यांनी दिली. 

सुखवंतने नवरा झोपेत असताना त्याच्या डोक्यावर रॉडने प्रहार केला. प्रहार इतका जोरदार होता कि, आझाद सिंह बेशुद्ध झाला. त्यानंतर सुखवंतने चाकूने नवऱ्याचे गुप्तांग कापले व टॉईलेटमध्ये फेकून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली. आझाद सिंहला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु होता. त्याची प्रकृती गंभीर आहे. आझाद सिंहच्या वडिलांच्या तक्रारीवरुन महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. 

Web Title: wife cut off her husband's genitalia

टॅग्स :Crimeगुन्हा