शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नवरा काळा असल्याने बायकोने झोपेतच जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 15:48 IST

बरेलीतील खुर्द फतेहगढ पोलीस ठाणेच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितले

लखनौ - उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे पत्नीनेच आपल्या नवऱ्याला जिवंत जाळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पती काळा असल्याने पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर तात्काळ पतीला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. 

बरेलीतील खुर्द फतेहगढ पोलीस ठाणेच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितले की, येथील 22 वर्षीय महिलेने आपल्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. घटनेनंतर तात्काळ पतीस रुग्णालयात नेण्यात आले होते, पण त्यांस मृत घोषित करण्यात आले. महिलेचे नाव प्रेमश्री असून तिला पोलिसांनी अटक केल्याचंही सिंह यांनी सांगितल. विशेष म्हणजे नवरा काळा असल्यानेच हे कृत्य करण्यात आल्याचे पत्नीनं म्हटलं आहे. 

सत्यवीर सिंह हे सोमवारी पहाटे 5 वाजता आपल्या घरातील खाटावर झोपले होते. त्याचवेळी, पत्नी प्रेमश्रीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना आग लावली. यावेळी पेट्रोलचे काही थेंब प्रेमश्रीच्या पायावरही पडले. ज्यामुळे तिचे पायही भाजले आहेत. या घटनेमुळे सत्यजीतचा आवाज ऐकून बाजू-बाजुच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, सत्यवीरला रुग्णालयात दाखल केले. पण, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. लग्नापासूनच प्रेमश्रीला सत्यवीर आवडत नसे, पतीच्या काळ्या रंगावरुन ती त्याला सातत्याने घालून-पाडून बोलत. पण, सत्यवीर तिच्यावर खूप प्रेम करत असे. त्यामुळे, आपली पत्नी असे काही करेल, याचा थोडाही अंदाज सत्यवीरल नव्हता. दरम्यान, पोलिसांनी पत्नी प्रेमश्रीविरुद्द 302 चा गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :fireआगDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी