शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? : पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप संचालकांनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 13:22 IST

"आम्हाला हिंसक नव्हे चांगले नागरिक घडवायचे आहेत."

 लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दंगलीबद्दल शिकवल्याने हिंसक व वैफल्यग्रस्त नागरिक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकांतील गुजरात दंगल, बाबरी मशीद संबंधित संदर्भ सुधारण्यात आले आहेत, असे राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी स्पष्ट केले. शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. 

पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल व बाबरी मशीद संदर्भातील बदलाबाबत छेडले असता सकलानी म्हणाले की, आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? आम्हाला हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक नाही तर सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत.  शालेय पाठ्यपुस्तकांतून त्यांना हे धडे का द्यावेत? विद्यार्थ्यांनी आक्रमक व्हावे, समाजात द्वेष निर्माण करावा आणि स्वत:ही द्वेषाला बळी पडावे अशा पद्धतीने आपण त्यांना शिकवायचे काय? आपण बालकांना दंगलीबाबत शिकवले पाहिजे का... ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते याबाबत शिकू शकतात; परंतु शालेय पाठ्यपुस्तकांतून त्यांना हे धडे का द्यावेत? मोठे झाल्यानंतर त्यांना हे समजू द्या की काय झाले, का झाले. बदलांबाबत ओरड करणे  अनावश्यक आहे.

पुस्तकात नवीन काय?अनेक संदर्भ वगळून आणि बदलांसह नवी पाठ्यपुस्तके बाजारात आली. तेव्हा सकलानी यांनी त्यांची भूमिका मांडली. इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्राच्या सुधारित पाठ्यपुस्तकात बाबरी मशिदीचा थेट उल्लेख नाही. त्याला मशिदीऐवजी तीन घुमटाचा ढाचा असेे संबोधण्यात आले आहे. अयोध्या वादावरचा इतिहास चार पानांवरून दोन पानांवर आणला गेला आहे.  आधीच्या आवृत्तीतील तपशील वगळण्यात आला आहे. सुधारित धड्यात राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे दिसते. न्यायालयाचा हा निर्णय देशात व्यापक प्रमाणात स्वीकारण्यात आला होता. 

आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत. आम्ही त्यात सर्वकाही ठेवू शकत नाही. आमच्या शिक्षणाचा उद्देश हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक घडवणे हा नाही. द्वेष आणि हिंसाचार हे शिकवण्याचे विषय नाहीत. आमची पाठ्यपुस्तके त्यावर केंद्रित असू नयेत. १९८४ च्या दंगलीचा पुस्तकांमध्ये उल्लेख नसल्यावरून असा गदारोळ होत नाही.      - दिनेश प्रसाद सकलानी, संचालक, एनसीईआरटी

काय वगळले ?भाजपची गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणि भाजपने अयोध्येतील घटनांबद्दल खेद व्यक्त करणे आदी संदर्भ पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आले आहेत.

हे भगवेकरण कसे ?- काही गोष्ट अप्रासंगिक झाली असेल तर... ती बदलावी लागेल. ती का बदलू नये. मला येथे भगवेकरण दिसत नाही. आम्ही इतिहास शिकवतो. त्यामुळे वस्तुस्थिती कळते.- आपण भारतीय ज्ञानप्रणालीबद्दल सांगत आहोत, तर ते भगवेकरण कसे असू शकते? जर आपण मेहरौलीतील लोखंडी खांबाबद्दल सांगत आहोत आणि भारतीय हे धातूविज्ञान शास्त्रज्ञापेक्षा पुढे आहेत असे म्हणत आहोत, तर आपण चुकीचे काय सांगतोय ? हे भगवेकरण कसे असू शकते?"

टॅग्स :Educationशिक्षण