लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोप केला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. यासंदर्भात बोलताना आरपीआय (आठवले) प्रमुख रामदास आठवले म्हणाले, सभागृह एकाच पक्षाचे नसते आणि प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले जाते, हा दावा चुकीचा आहे.
राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही, असे म्हणणे चुकीचे आणि खोटे -आठवले म्हणाले, जेव्हा कोणी चुकीची किंवा दिशाभूल करणारी विधाने करते, तेव्हा लोकसभा अध्यक्ष त्यांना रोखतात. विशेषतः जेव्हा विरोधक सभागृहात गदारोळ करतात, तेव्हाच अशा प्रकारची कारवाई केली जाते. राहुल गांधी यांनी याआधीही दीर्घकाळ आपले म्हणणे मांडले आहे, त्यामुळे त्यांना बोलू दिले जात नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. खोटे आहे.
राहुल गांधींनी चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करू नये -आठवले पुढे म्हणाले, राहुल गांधींना चुकीचे संदर्भ दिल्यानेच रोखावे लागते. राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. मात्र, ते पुस्तक प्रकाशितच झालेले नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे विधाने करून राहुल गांधी स्वतःचीच प्रतिमा मलीन करत असल्याचेही ते म्हणाले. शेवटी, राहुल गांधींनी सभागृहात आपले मत मांडावे, परंतु चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करू नये, असा सल्लाही आठवले यांनी यावेली राहुल गांधी यांना दिला.
Web Summary : Union Minister Ramdas Athawale refuted claims that Rahul Gandhi is blocked from speaking in Parliament. He stated everyone has the right to speak, but speakers intervene if misleading statements are made. Athawale advised Gandhi to avoid misrepresenting facts, referencing an inaccurate book citation.
Web Summary : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने राहुल गांधी को संसद में बोलने से रोके जाने के दावों का खंडन किया। उन्होंने कहा कि हर किसी को बोलने का अधिकार है, लेकिन भ्रामक बयान देने पर स्पीकर हस्तक्षेप करते हैं। आठवले ने गांधी को गलत तथ्य पेश करने से बचने की सलाह दी, जिसमें एक गलत किताब का हवाला दिया गया।